‘मेट्रो-३’च्या डब्यांच्या प्रतिकृतीचे अनावरण शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ने मेट्रो-३चे डबे तयार करण्याचे काम अ‍ॅलस्टॉम ट्रान्स्पोर्ट इंडिया लिमिटेड या कंपनीला दिले आहे. मेट्रो ३च्या संपूर्ण भूमिगत मार्गिके ला ‘अ‍ॅक्वा लाइन’ असे संबोधले जाईल. या मार्गिके साठी आठ डब्यांच्या एकू ण ३१ गाडय़ा तयार केल्या जाणार आहेत. हे काम नोव्हेंबर महिन्यात सुरू होईल व एक वर्षांच्या आत पहिली गाडी मुंबईत दाखल होणे अपेक्षित आहे.

केंद्र शासनाच्या मेक इन इंडिया या संकल्पनेप्रमाणे मेट्रो ३च्या सर्व गाडय़ांची निर्मिती भारतात म्हणजेच अ‍ॅलस्टॉम इंडिया यांच्या आंध्र प्रदेशातील श्री सिटी येथील कारखान्यात होणार आहे. हे डबे विनाचालक कार्यान्वयनासाठी सक्षम असतील. कधीही न झोपणारे आणि गतिमान शहर म्हणून प्रचलित असणाऱ्या मुंबईचा विचार करून मेट्रो ३च्या डब्यांची रचना करण्यात आली आहे. मुंबईचा समुद्र, वाहत्या पाण्याचा ताजेपणा आणि गती

यावर आधारित रंगसंगती असणार आहे. यामध्ये फिका हिरवा (अ‍ॅक्वा ग्रीन) आणि फिका पिवळा (बेज) या रंगांचा वापर करण्यात आला आहे.

डब्याची वैशिष्टय़े

*  संपूर्णत: वातानुकू लित यासह आद्र्रता नियंत्रण व्यवस्था

*  सुरक्षित आरामदायी प्रवास

*  प्रवाशांच्या मनोरंजनासाठी व जाहिरातीकरिता एलसीडी

*  मार्गिकेचा डिजिटल नकाशा

*  प्रवाशांसाठी उद्घोषकांचा वापर

*  सुंदर बैठक व्यवस्थेसह उभे राहण्यासाठी खांबांची व्यवस्था

*  अपंग प्रवाशांची चाकाची खुर्ची ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था

*  एयर सस्पेन्शन, सीसीटीव्ही, अग्निशमन, धूर व अग्निशोधक यंत्रणा

*  आपत्कालीन परिस्थितीत प्रवासी व ट्रेन नियंत्रक यांच्यात संवाद राहण्यासाठी ध्वनिसंवाद यंत्रणा