सातही धरणांत ६० टक्क्यांपर्यंत जलसंचय

मुंबई : बुधवारी एका दिवसात धरण क्षेत्रात पडलेल्या पावसाने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणीसाठय़ात चांगलीच वाढ झाली आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांत मिळून ६० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या दहा बारा दिवसांत साधारण तीन महिन्याचा पाणीसाठा जमा झाला आहे. गुरुवापर्यंत धरणात ८ लाख ७० हजार दशलक्ष लिटरपेक्षा अधिक पाणीसाठा जमा झाला होता.

जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे मुंबईत सध्या २० टक्के पाणीकपात सरू आहे. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासून पावसाने चांगलाच जोर धरला असून गेल्या दहा बारा दिवसात पाणीसाठय़ात चांगलीच वाढ झाली आहे. गुरुवापर्यंत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ८ लाख ७० हजार ८४२ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा असून पूर्ण क्षमतेच्या ६० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी सर्व तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले असावे लागतात.  १ ऑगस्ट रोजी तलावात अवघा ५ लाख १ हजार १६० दशलक्ष लिटर म्हणजे ३४.६३ दशलक्ष लिटर पाणीसाठा होता. गेल्या दहा बारा दिवसात तलावात तीन लाख ६९ हजार ६९७ दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली आहे. मात्र गेल्या दोन वर्षांंच्या तुलनेने पाणीसाठा अजूही खूप कमी आहे.

२०१८ : १२ लाख ७७ हजार  ३७३ दशलक्ष लिटर

२०१९ : १३ लाख ३७ हजार ०७७ दशलक्ष लिटर

२०२० : ८ लाख ७० हजार ८४२ दशलक्ष लिटर

तलावातील पाणीसाठा (दशलक्ष लिटर )

तलाव          आवश्यक साठा   पाणीसाठा       टक्केवारी

अप्पर वैतरणा   २,२७,०४७       ९७,१४१            ४२.७८

मोडकसागर     १,२८,९२५       ९०,६४२             ७०.३१

तानसा              १,४५,०८०       ८८,६७४           ६१.१२

मध्य वैतरणा    १,९३,५३०       १,२३,०५८         ६३.५९

भातसा           ७,१७,०३७       ४,३५,५८३             ६०.७५

विहार         २७,६९८              २७,६९८               १००

तुलसी         ८,०४६              ८,०४६                   १००

एकूण         ८,७०,८४२       १४,४७,०००         ६०.१७