मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या(यूपीएससी) परीक्षेत ९३वे स्थान पटकावणाऱ्या ऐश्वर्या शेरॉन हिच्या नावे इन्स्टाग्रामवर १६ बनावट खाती आढळली. हा प्रकार लक्षात येताच ऐश्वर्याने कु लाबा पोलीस ठाण्यात तक्रोर दिली. त्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.  ऐश्वर्या २०१६ सालच्या ‘फे मिना मिस इंडिया’ स्पर्धेच्या अंतिम फे रीतील स्पर्धक होती. याशिवाय तिने विविध सौंदर्य स्पर्धा जिंकल्या आहेत.

४ ऑगस्टला स्पर्धा परीक्षांचा निकाल जाहीर झाला. त्यात ऐश्वर्याने ९३वे स्थान पटकावले. सौंदर्य स्पर्धासह यूपीएससीतही यश मिळाल्याने माध्यमांनी तिच्या मुलाखतीसाठी धडपड सुरू के ली. आघाडीच्या इंग्रजी दैनिकाने मुलाखत आटोपताना ऐश्वर्याकडे इन्स्टाग्रामवरील नेमके  खाते कोणते, असा प्रश्न के ला. त्या खात्यावर मुलाखत टॅग करता येईल, असे दैनिकाच्या प्रतिनिधीने सुचविले. त्यावर ऐश्वर्याने इन्स्टाग्रामवर एकही खाते नसल्याचे सांगताच संबंधित प्रतिनिधीने तिच्या नावे असलेल्या काही खात्यांबाबत माहिती दिली. ऐश्वर्याने इन्स्टाग्रामवर पाहिले असता तिचे नाव, छायाचित्रे आणि वैयक्तिक तपशिलांसह १६ बनावट खाती आढळली. त्याबाबत तिने कु लाबा पोलीस ठाण्यात तक्रोर दिली.

या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ कनुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू के ल्याची माहिती कु लाबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शिवाजी फडतरे यांनी दिली.