03 March 2021

News Flash

सरकारविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न

डाव्या कार्यकर्त्यांच्या अटकेचा ३७ संस्था-संघटनांकडून निषेध

डाव्या कार्यकर्त्यांच्या अटकेचा ३७ संस्था-संघटनांकडून निषेध

कथित नक्षलवादी समर्थकांच्या अटकसत्रानंतर याचे देशभरात तीव्र प्रतिसाद उमटू लागले असून मुंबईतील ३७ स्वयंसेवी संस्था व संघटना या अटकेच्या निषेधार्ह एकवटल्या आहेत. अटक केलेल्यांना सोडण्यात यावे, अशी मागणी संघटनांच्या वतीने मुंबईत पत्रकार परिषदेत करण्यात आली.

यूएपीए हा कायदा सरकार चुकीच्या रीतीने वापरत असल्याने रद्दबातल करण्यात यावा. भीमा कोरेगावच्या आयोजकांवर दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यात यावा. त्याचसोबत, ज्या पोलिसांनी कारवाई करण्याचे आदेश दिले त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या या वेळी संघटनांच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

जे या सरकारच्या मतांशी सहमत नसतात त्यांच्या विरोधात या सरकारने अटकसत्र राबवायला सुरुवात केली आहे, असे समन्वयक मिहिर देसाई यांनी सांगितले. तसेच हिंदू कट्टरवादी संस्थांच्या कार्यकर्त्यांवर होणाऱ्या कारवाईवरून लक्ष दुसरीकडे वेधण्याचा हा प्रयत्न आहे. लेखकांच्या घरी पुस्तके सापडतात आणि सनातनसारख्या हिंदुत्ववादी संघटनेकडून दारूगोळा व शस्त्रसाठा मिळतो यावरूनच आपल्या लक्षात यायला पाहिजे हे सरकार पुरोगाम्यांना दाबण्याचा प्रयत्न करते आहे. तसेच पंतप्रधानांच्या विरोधातल्या कटाचे पत्र प्रसारमाध्यमांकडे देण्यापेक्षा ते न्यायालयात का नाही सादर केले, असा प्रश्न महिला संघटनेच्या हसिना खान यांनी केला.

माजी न्यायाधीश बी.जी. कोळसे  म्हणाले, अटक झालेल्या लोकांचा आणि आमचा काही संबंध नाही. आम्ही या मनुवादी सरकारच्या विरोधात शनिवारवाडय़ावर चार ते पाच हजार लोकांना शपथ दिली होती. ती यांना झोंबली असून त्यामुळे हे अटकसत्र सरकारतर्फे चालू आहे असा आरोप त्यांनी केला.

भिडेंना अटक कधी?

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावरही आरोप आहेत. मिलिंद एकबोटे यांना अटक करण्यात आली आहे, पण भिडे यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, याकडे लक्ष वेधण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 30, 2018 1:43 am

Web Title: urban naxal in india
Next Stories
1 राष्ट्रवादीने राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावावी
2 संघाच्या विचारांच्या विरोधात काँग्रेसची लढाई!
3 ‘जीएसटी’च्या पेचापायी तीन लाख घरे पडून!
Just Now!
X