News Flash

राज्यात पाच ठिकाणी ‘उर्दू घर’

मुंबई : राज्यात  उर्दू भाषेची वाड:मयीन प्रगती व्हावी, मराठी व उर्दू भाषेतील लेखक, कवी, विचारवंत इत्यादींमध्ये सृजनशील विचारांची देवाणघेवाण होऊन उर्दू भाषेचा विकास व्हावा, यासाठी

मुंबई : राज्यात  उर्दू भाषेची वाड:मयीन प्रगती व्हावी, मराठी व उर्दू भाषेतील लेखक, कवी, विचारवंत इत्यादींमध्ये सृजनशील विचारांची देवाणघेवाण होऊन उर्दू भाषेचा विकास व्हावा, यासाठी अल्पसंख्याक विभागाकडून राज्यात पाच ठिकाणी उर्दू घर निर्मिती करण्यात येत असल्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

नांदेड येथील उर्दू घराचे काम पूर्ण झाले असून त्यासाठी आठ कोटी १६ लाख रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. लवकरच त्याचे लोकार्पण करण्यात येईल. सोलापूर येथे उर्दू घराचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून त्याकरिता आतापर्यंत सहा कोटी ८२ लाख रुपये इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. मालेगाव उर्दू घराचे काम पूर्ण होऊन ते कार्यान्वित करण्याची कार्यवाही सुरु आहे. मुंबई येथे मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात उर्दू घर बांधणे प्रस्तावित असून याबाबतचा प्रस्ताव मुंबई विद्यापीठाकडून शासनास सादर केला जाणार आहे. नागपूर येथील इस्लामिक कल्चरल सेंटरची इमारत उर्दू घर म्हणून विकसित करण्यात येत आहे. यासाठी ५० लाख रुपये इतके अनुदान वितरीत करण्यात आले आहे, असे मलिक यांनी नमूद केले.

होणार काय?

उर्दू घरांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विविध भाषेतील पुस्तकांचे प्रकाशन इत्यादी स्वरुपाचे कार्यक्रम होतील. उर्दू घरातील वाचनालय, ग्रंथालयामध्ये उर्दू, मराठी आणि हिंदी भाषेतील वर्तमानपत्रे, उर्दू भाषेतील नियतकालिके, पुस्तके उपलब्ध असतील.

प्रशिक्षण आणि मार्गदर्शन…

नवी दिल्ली येथील उर्दू भाषा राष्ट्रीय परिषद (नँशनल काऊन्सिल फॉर प्रमोशन ऑफ उर्दू लँग्वेज ) संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षण कार्यक्रम, अभ्यासक्रम यांच्या धर्तीवर उर्दू घरांमध्ये प्रशिक्षण, अभ्यासक्रम चालविले जातील. यासाठी परिषदेकडून अनुदान, मार्गदर्शन मिळविले जाईल. उर्दू भाषिक नसलेल्या समुदायाला उर्दू शिकविण्यासाठी  वर्ग चालविणे जाणार आहेत, असे मलिक यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2021 12:18 am

Web Title: urdu houses in five places in the state akp 94
Next Stories
1 मेंढपाळ समाजाच्या लोकरीच्या वस्तू ‘अ‍ॅमेझॉन अ‍ॅप’वर!
2 Vaccine Crisis: मुंबईत उद्या लसीकरण होणार नाही; मुंबई महानगरपालिकेची सूचना
3 विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेऊच! आधी १२ आमदार नियुक्तीचा विषय निकाली काढा – नवाब मलिक
Just Now!
X