News Flash

“जागा आणि वेळ तुम्ही सांगा मी तिथे येते”; उर्मिला यांचं कंगनाला खुलं आव्हान

नवीन ऑफिसवरून डिवचणाऱ्या कंगनाला उर्मिला यांचे खुले आव्हान

अभिनेत्री कंगना रनौत काही महिन्यांपासून सतत विविध कारणांमुळे चर्चेत आहे. यावेळी तिने पुन्हा एकदा अभिनेत्री आणि शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांना लक्ष्य केलं. कंगना रणौतने उर्मिलाने घेतलेल्या नवीन ऑफिसवरून टिकास्त्र सोडल्यानंतर आता उर्मिलानेही कंगनाला थेट आव्हान दिलं आहे. “तुम्ही जागा आणि वेळ सांगा, मी सगळी फ्लॅट आणि ऑफिसची डॉक्युमेंट्स घेऊन हजर होते. त्याबदल्यात तुम्ही फक्त ड्रग्ज घेणा-यांची ती यादी द्या”, अशा शब्दांत उर्मिला यांनी कंगनाला आव्हान दिलंय.

आणखी वाचा- नव्या वर्षात कंगना-उर्मिलाची नवी खडाजंगी; पाहा काय आहे प्रकरण

उर्मिला मातोंडकर यांनी अलिकडेच मुंबईत नवीन कार्यालय खरेदी केले. त्यावरुन कंगना रनौतने “मी एवढ्या मेहनतीने घर बांधलं तेही काँग्रेसने तोडलं. खरंच लोकं म्हणतात तसं भाजपाला साथ देऊन तर माझ्या हाती काय लागलं… तर 20-25 कोर्ट केसेस. तुमच्याप्रमाणे मी समजदार नाही ना, नाहीतर मी पण काँग्रेसचा हात पकडला असता. किती मूर्ख आहे मी…” असं ट्विट करत उर्मिलाला लक्ष्य केलं होतं.  त्यावर प्रत्युत्तर देताना उर्मिला यांनी ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. गणपती बाप्पा मोरया या कॅप्शनसह पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये,  “नमस्कार कंगना जी…माझ्याबद्दलचे तुमचे जे उच्च विचार आहेत ते मी ऐकले आहेत. मीच काय तर पूर्ण देशाने ते विचार ऐकलेत. आज पूर्ण देशासमोर मी तुम्हाला सांगू इच्छिते, जागा आणि वेळ तुम्ही ठरवा…मी माझे सगळे कागदपत्र तेथे घेऊन येते…मी केलेला हा सर्व व्यवहार राजकारणात येण्याआधी केला होता. याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. तुम्ही फक्त एक काम करा, एनसीबीला तुम्ही जी यादी देणार होतात, ती द्या. तुमच्याकडे अशा कोणत्या लोकांची नावे,आहेत याची माहिती मलाच काय पण देशाला जाणून घेण्याची उत्सुकता आहे…तुमच्या उत्तराची वाट बघतेय.. तोपर्यंत…जय हिंद…जय महाराष्ट्र आणि गणपती बाप्पा मोरया”, असं आव्हान उर्मिला यांनी कंगनाला दिलं आहे.

आणखी वाचा- उर्मिला मातोंडकर यांनी ३ कोटी ७५ लाख रुपयांचं खरेदी केलं ऑफिस


दरम्यान, उर्मिला मातोंडकर आणि कंगना रनौत यांच्यातील लढाई गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. आता 2021 ची सुरुवातही अशाच एका वादाने झालीये.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2021 8:44 am

Web Title: urmila matondkar hits back at kangana ranaut after her comment on buying 3 crore office in mumbai sas 89
Next Stories
1 लसमान्यतेचे निकष जाहीर करा!
2 समाजमाध्यमावरून मैत्री करून घरफोडी
3 बारावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर, दहावीची ३ मेनंतर : शिक्षणमंत्री
Just Now!
X