News Flash

बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ? उर्मिला मातोंडकर यांचा कंगनाला टोला

उर्मिला यांनी कंगनाचं नाव न घेता तिच्यावर निशाणा साधला आहे.

अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेनेत झालेल्या वादानंतर कंगना पहिल्यांदाच मुंबईत परतली. मुंबईत राहण्यासाठी केवळ बाप्पाच्याच परवानगीची गरज लागते. इतर कुणाच्या परवानगीची गरज नाही, अशा शब्दांत शिवसेनेला डिवचणाऱ्या कंगनाला शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी टोला लगावला आहे. बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ, असा मिश्किल सवाल करत उर्मिला यांनी कंगनाचं नाव न घेता तिच्यावर निशाणा साधला आहे.

माझ्या प्रिय मुंबई शहराच्या पाठी उभं राहण्यासाठी असं म्हणत उर्मिला यांनी बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का भाऊ, असा सवाल केला. उर्मिला यांनी याआधीही कंगनावर हल्लाबोल केला होता. त्यामुळे त्यांच्या या ट्विटनंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर शाब्दिक चकमक रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

आणखी वाचा : “मला मुंबईत राहण्यासाठी केवळ त्याच्या परवानगीची गरज…”; कंगनाचा टोला

कंगना रणौतने मंगळवारी सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर तिने माध्यमांशी संवाद साधला. मला मुंबईत राहण्यासाठी केवळ गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज आहे. मी इतर कोणाकडेही परवानगी मागितली नाही, असं म्हणत तिने शिवसेनेला टोला लगावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2020 10:23 am

Web Title: urmila matondkar takes a jibe at kangana ranaut says has she fallen on her head ssv 92
Next Stories
1 अकरावीसाठी अर्ज जास्त, तरीही जागा रिक्त
2 हवाई प्रवासामुळे प्रवाशांना घाम
3 बाळातील व्यंगत्वाच्या निदानासाठी वाडियात सुविधा
Just Now!
X