मुंबई : विधान परिषदेवरील राज्यपालनियुक्त जागेसाठी शिवसेनेने शिफारस के लेल्या अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर या आज, मंगळवारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. विधान परिषदेवरील राज्यपालनियुक्त जागेसाठी शिवसेनेच्या कोटय़ातून ऊर्मिला मातोंडकर यांचे नाव महाविकास आघाडी सरकारने पाठवले होते. त्यानंतर आता मातोंडकर मंगळवारी शिवसेनेत प्रवेश करतील, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना स्पष्ट के ले.
मंगळवारी सायंकाळी ४ वाजता जुहू येथे पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार असल्याचे ऊर्मिला मातोंडकर यांनी जाहीर केले मातोंडकर यांनी गेल्या वर्षी काँग्रेस पक्षाच्या वतीने उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. परंतु त्यांचा तेव्हा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षातील गोंधळावर बोट ठेवत पक्षाचा राजीनामा दिला होता. काँग्रेसच्या राजीनाम्यानंतर त्या राजकारणात सक्रिय नव्हत्या.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 1, 2020 4:08 am