मुंबई : शासकीय रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व सलग्न रुग्णालये  आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रुग्णालयांमध्ये वैद्यकीय प्राणवायू प्रकल्प उभारण्यासाठी आमदार निधी खर्च करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

वैद्यकीय प्राणवायूचा तुटवडा जाणवू लागला आहे. करोनाचा सर्व स्तरावर मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाने या आधीच आमदार स्थानिक विकास निधीतील एक कोटी रुपयांपर्यंचा खर्च  शासकीय रुग्णालयांमध्ये वैद्यकीय यंत्रसामुग्री व औषधे खरेदीसाठी वारण्यास परवानगी दिली आहे. त्यात प्राणवायू सिलिंडर, बेड, व्हेंटिलेटर, करोना प्रतिबंधक औषधे इत्यादी दहा प्रकारच्या यंत्रसामुग्री, साहित्य व औषधांचा समावेश आहे. आता राज्य सरकारने शासकीय रुग्णालयांमध्ये वैद्यकीय प्राणवायू प्रकल्प उभारण्यासाठी, तसेच प्राणवायू साठवणुकीसाठी टाक्या खरेदीकरण्याकरिता आमदार निधीतून खर्च करण्यास मान्यता दिली आहे. राज्याच्या नियोजन विभागाने बुधवारी तसा शासन आदेश काढला आहे.