31 October 2020

News Flash

खोब्रागडे, गजभिये काँग्रेसमध्ये

बीड जिल्ह्य़ातील काही नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षातून सुरू झालेली जावक आता कमी होऊन अन्य पक्षातील नेते किंवा कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करू लागले आहेत. उत्तम खोब्रागडे आणि किशोर गजभिये या दोन निवृत्त सनदी अधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत पक्षात प्रवेश केला.

‘बेस्ट’चे माजी व्यवस्थापक उत्तम खोब्रागडे आणि किशोर गजभिये या दोन निवृत्त सनदी अधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. खोब्रागडे हे  रिपाई आठवले तर खोब्रागडे हे बहुजन समाज पक्षात सध्या होते. या दोन निवृत्त सनदी अधिकाऱ्यांना पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश देण्यात आला. दलित समाजातील दोन अधिकाऱ्यांना काँग्रेसमध्ये सामावून घेण्यात आले असले तरी त्याचा पक्षाला कितपत फायदा होईल, अशी शंका पक्षातच व्यक्त केली जात आहे. प्रशासनात काम केलेले आणि समाज यांच्यात मोठी दरी असते. यामुळे एखाद्या स्थानिक नेत्याचा जेवढा फायदा होतो तेवढाही फायदा या दोन निवृत्त अधिकाऱ्यांमुळे होणार नाही, असे मत काँग्रेसच्या गोटातून व्यक्त करण्यात आले.

चारच दिवसांपूर्वी बीड जिल्ह्य़ातील काही नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यापाठोपाठ दोन निवृत्त सनदी अधिकारी दाखल झाले.

भाजपसह अन्य काही पक्षांतील नेते काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी संपर्कात आहेत. योग्य वेळी अशा नेत्यांना पक्षात प्रवेश दिला जाईल.     – खासदार अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2018 1:05 am

Web Title: uttam khobragade and kishore gajbhiye enter in congress party
Next Stories
1 मतदानसक्ती करा!
2 मंत्रालयातील आत्महत्या प्रश्नावर ‘जनता दरबारा’चा उतारा?
3 स्टेट बँकेला १७ वर्षांत प्रथमच तोटा
Just Now!
X