News Flash

बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयात लसीकरण केंद्र

आणखी १५ खासगी रुग्णालयांचा लसीकरणात समावेश

(संग्रहित छायाचित्र)

जोगेश्वरी येथील पालिकेच्या बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयासह विमा योजनेअंतर्गत समावेश असलेल्या आणखी १५ खासगी रुग्णालयांमध्ये शुक्रवारपासून लसीकरण केंद्र सुरू झाली आहे. पालिकेसह खासगी रुग्णालयांची संख्या वाढल्याने आता १७७ लसीकरण कक्ष कार्यान्वित झाले आहेत. त्यामुळे लसीकरण वेगाने होत असून शुक्र वारी २९ हजार ४८७ लाभार्थ्यांंचे लसीकरण पूर्ण झाले.

प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत सहभागी असलेल्या दहा रुग्णालयांमध्ये शुक्रवारपासून लसीकरण केंद्र सुरू झाली आहेत. याव्यतिरिक्त जोगेश्वरी येथील पालिकेच्या बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयातही लसीकरण सुविधा सुरू झाली आहे.

सध्या पालिकेची २३, सरकारी रुग्णालयातील दोन आणि २८ खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू आहे.

खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणास चांगला प्रतिसाद मिळत आहे. शुक्र वारी ६० वर्षांवरील १९ हजार ९५९ ज्येष्ठ नागरिकांना लस दिली गेली, तर ४५ वर्षांवरील २,१९९ जणांनी, तसेच सुमारे पाच हजार आरोग्य आणि २,२६६ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी लस घेतली.

शुक्र वारपर्यत १ लाख ४९ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी तर १ लाख ५ हजार अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. ज्येष्ठ नागरिकांमध्ये ५२ हजार ७७७ आणि ४५ वर्षांवरील ५३२७ जणांचे लसीकरण झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2021 1:00 am

Web Title: vaccination center at balasaheb thackeray trauma hospital anm 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 करोनावरील ‘रेमडेसिवीर’च्या किंमती कमी करा!
2 राज्यात पेट्रोल, डिझेल स्वस्त?
3 एसटीचे सारथ्य आता महिलांकडे
Just Now!
X