देशभर गुरुवारपासून (१ एप्रिल) ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यास सुरुवात होणार असून त्यामुळे मुंबईत सध्या सुरू असलेल्या मोहिमेत साधारण ४० लाख नागरिकांची भर पडणार आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी महानगरपालिके मार्फत दोन सत्रांत लसीकरण सुरू करण्यात येणार आहे.

मुंबईत आतापर्यंत उद्दिष्टाच्या साधारण २० टक्केच लसीकरण झाले असून आतापर्यंत १० लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. सध्या ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेले ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. आता १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वच नागरिकांसाठी लस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबईत ४५ वर्षांवरील निरोगी नागरिकांची संख्या साधारण ४० लाख आहे. सध्या सुरू असलेल्या मोहिमेत गुरुवारपासून या नागरिकांची भर पडणार आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी आता दोन सत्रात ही मोहीम राबवण्यात येणार असून सकाळी ७ ते दुपारी २ आणि दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत  लसीकरण होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

सध्या लसीकरणाची एकू ण १०८ केंद्रे असून त्यापैकी २९ पालिके ची, राज्य व केंद्र सरकारची १३ आहेत. त्याचप्रमाणे ५९ खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी आहे. याशिवाय आणखी २६ खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी द्यावी म्हणून केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे मुंबईत सध्या दररोज सरासरी ४० ते ४५ हजारपर्यंत कोविड चाचण्या होत आहेत. ही संख्या दर दिवशी लाखांपर्यंत नेण्याचे पालिके चे प्रयत्न आहेत.

लशीचा साठा पुरेसा

लशीचा पुरवठा सुरळीत होत असून सध्या मुंबईत २ लाख मात्रा उपलब्ध आहेत. दिवसाला ४० हजार लोकांचे लसीकरण के ले जात आहे. ४५ वर्षांवरील सर्वांना लस द्यायची असल्यास लशीचा साठा योग्य प्रमाणात असून लस देण्याचीही तयारी झाली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

उच्च न्यायालयाचे प्रत्यक्ष कामकाज

मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठाचे कामकाज तूर्त प्रत्यक्षच सुरू राहणार आहे. मुंबई पालिकेकडून ४५ वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाचे न्यायमूर्ती, वकील, त्यांचे पती, पत्नी तसेच कर्मचारी वर्ग या सगळ्यांसाठी २ ते ४ एप्रिलदरम्यान विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे.  मुंबई शहर आणि पश्चिम, पूर्व आणि मध्य उपनगरात अशी चार लसीकरण केंद्र उपलब्ध करण्यात आली आहेत. तीन दिवसांत तीन ते चार हजार जणांना लस मिळण्याचा अंदाज आहे.  करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पाश्र्वाभूमीवर मुंबई खंडपीठाचे कामकाज प्रत्यक्ष व ऑनलाइन पद्धतीने चालवण्याची मागणी वकिलांच्या संघटनांनी केली होती. याबाबत मुख्य न्यायमूर्तींसह प्रशासकीय न्यायमूर्ती आणि वकिलांच्या संघटनांची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीला पालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल हेही उपस्थित होते. या वेळी मुंबई टाळेबंदीची गरज नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. त्यानंतर मुख्य न्यायमूर्ती आणि प्रशासकीय न्यायमूर्तींनी तूर्त ऑनलाइन सुनावणी न घेण्याचा निर्णय घेतला, असे सूत्रांनी सांगितले.

पुणे जिल्ह््यात २८,६५२ जणांना लस

पुणे जिल्ह््यातील २७,२५४ नागरिकांनी मंगळवारी करोना प्रतिबंधात्मक लशीचा पहिला डोस घेतला, तर १३९८ जणांनी दुसरा डोस घेऊन लसीकरण पूर्ण के ले. त्यामुळे जिल्ह््यात दिवसभरात २८,६५२ जणांचे लसीकरण पूर्ण झाले. पुणे शहरात ११,४०६ जणांचे, पिंपरी-चिंचवडमध्ये ३,९७८ तर जिल्ह््याच्या ग्रामीण भागात १३,२६८ जणांचे लसीकरण करण्यात आले.