राज्यातील १८ ते २५ वयोगटातील विद्यार्थ्यांचे करोना लसीकरण महाविद्यालय किंवा विद्यापीठाच्या माध्यमातून करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरूवारी दिली.

देशभरातील १८ वर्षांवरील नागरिकांना १ मेपासून लस देण्यास केंद्राने परवानगी दिली आहे. सध्या राज्यातील महाविद्यालये, विद्यापीठांशी साधारण ३६ लाख ८७० विद्यार्थी संलग्न आहेत. या विद्यार्थ्यांचे विद्यापीठ व महाविद्यालयातच लसीकरण करण्यात येणार आहे. याबाबत राज्यपाल, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांच्याशी चर्चा करून अंतिम योजना जाहीर करण्यात येईल असे सामंत यांनी सांगितले.

nashik accident
नाशिक: शालेय बसला अपघात, चार विद्यार्थी जखमी
Some results still pending post graduate law students regretting
मुंबई : काही निकाल अद्यापही रखडलेले, पदव्युत्तर विधि शाखेच्या विद्यार्थ्यांना मनःस्ताप
Seven new nursing colleges
राज्यात सात नवी परिचर्या महाविद्यालये सुरू करणार – हसन मुश्रीफ
in Kalyan student beaten for playing cricket
कल्याणमध्ये क्रिकेट खेळण्यावरून विद्यार्थ्याला मारहाण

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक सामंत यांनी घेतली. त्यावेळी लसीकरण मोहिमेबरोबरच विद्यापीठांच्या परीक्षा, पुढील शैक्षणिक वर्षाचे नियोजन यांबाबत चर्चा करण्यात आली. शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू करण्यात येणार असून याबाबत येत्या १५ दिवसांत निर्णय घेण्यात येईल. सर्व परीक्षा घेत असताना एकही विद्यार्थी करोनाबाधित होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात येईल. सर्व परीक्षा ऑनलाइनच होतील. विद्यार्थ्यांचे आरोग्य हे सर्वांच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. विविध प्रवेश परीक्षांचे वेळापत्रकही लवकरच जाहीर करण्यात येईल, असे सामंत यांनी सांगितले. उच्च शिक्षण विभागाचे संचालक धनराज माने, तंत्रशिक्षण संचालक अभय वाघ, सीईटी सेल आयुक्त चिंतामणी जोशी, कला संचालक राजीव मिश्रा हेदेखील या वेळी उपस्थित होते.

४८ खासगी केंद्रे बंद,  तरीही लसीकरण वेगात

मुंबई : लससाठ्याअभावी गुरुवारी देखील ४८ खासगी लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याची वेळ आली; मात्र पालिके च्या ४२ केंद्रांवर लसीकरण सुरू होते. दिवसभरात तब्बल ४८ हजारांहून अधिक लोकांचे लसीकरण करण्यात आले.  मुंबईतील लसीकरण केंद्रांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवली जात आहे. सध्या मुंबईत १३२ केंद्रांवर लसीकरण होते आहे. त्यापैकी ४२ पालिकेची केंद्रे आहेत, तर ७३ खासगी केंद्रे व १७ केंदे् राज्य व केंद्र सरकारी रुग्णालयात आहेत. गुरुवारी एकू ण ४८ हजार १५२ लोकांना लस देण्यात आली. त्यापैकी २१ हजार ९९० लोकांनी लशीची दुसरी मात्रा घेतली तर, २६ हजार १६२ लोकांनी पहिली मात्रा घेतली. खासगी केंद्रांवर दिवसभरात केवळ २ हजार ८०० लोकांनाच लस देता आली. मात्र पालिके च्या केंद्रांवर तब्बल ३८ हजारांहून अधिक लोकांना लस देण्यात आली. सध्या एकू ण २१ लाखांहून अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे.