News Flash

राज्यात लशींचा तुटवडा!

अपुऱ्या साठ्याबाबत राजेश टोपेंची चिंता; पनवेल, सांगली, साताऱ्यात लसीकरण ठप्प

संग्रहित छायाचित्र

करोनाबाधितांची झपाट्याने वाढत जाणारी संख्या लक्षात घेऊन सरकारने लसीकरणाचा वेग वाढवला असून, रोज ३ लाख लोकांचे लसीकरण केले जात आहे. दररोज सहा लाख लोकांच्या लसीकरणाचे लक्ष्य असताना लशींचा तुटवडा भासत आहे, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी सांगितले. लसतुटवड्यामुळे पनवेल, सांगली, साताऱ्यात लसीकरण ठप्प झाले आहे.

सद्य:स्थितीत राज्यात फक्त १४ लाख लसमात्रा शिल्लक असून, हा साठा के वळ तीन दिवस पुरेल. वेळेत लशींंचा पुरवठा झाला नाही तर लसीकरण बंद पडेल. त्यामुळे लशीचा पुरवठा करा, अशी मागणी वारंवार केंद्र सरकारकडे करण्यात येत असल्याची माहितीही टोपे यांनी दिली. जागतिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधताना टोपे यांनी राज्यातील करोना लशींच्या टंचाईबाबत गंभीर चिंता व्यक्त के ली. राज्यात करोना संसर्गाचा उद्रेक होत असून, सद्य:स्थितीत ४ लाख ७० हजारपेक्षा जास्त उपचाराधीन रुग्ण आहेत. पण लस नसल्याने म्हणून काही लसीकरण केंदे्र बंद ठेवावी लागत आहेत. अनेक केंद्रावरून लस नाही  म्हणून लोक परत जात आहेत. लसीकरणासाठी गावागावांत पथक पाठवत आहोत. तशी यंत्रणा आम्ही उभी केली आहे. पण लसपुरवठ्यासाठी मंगळवारी कें द्रीय आरोग्यमंत्र्यांना कळकळीची विनंती के ल्याचेही टोेपे यांनी सांगितले. रोजगाराच्या निमित्ताने सर्वात जास्त फिरणारा वर्ग २० ते ४० या  वयोगटातील आहे. त्यामुळे हे लोक जास्त करोनाग्रस्त  होत असल्याने १८ वर्षांच्या पुढे सर्वांचे लसीकरण करण्याची  मागणी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्याला दर आठवड्याला ४० लाख लशींची गरज आहे. पण, तेवढा पुरवठा होत नसल्याने लोकांना लसीकरण केंद्रातून परतावे लागत आहे. त्यामुळे इतर राज्यात नंतर करा, पण महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे इथे आधी लस द्या, अशी मागणी करण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले.

दरम्यान, पनवेल पालिकेने २१ केंद्रांवर लशींअभावी लसीकरण होणार नसल्याचे बुधवारी स्पष्ट केले. सातारा आणि सांगली जिल्ह््यात आज लसीकरण केंद्रावर लस संपल्याचे फलक लावण्यात आले. साताऱ्यात शंभर टक्के लस संपल्याने ही मोहीम काही काळासाठी थांबवली आहे, तर सांगलीत ज्या केंद्रावर थोडासा साठा शिल्लक आहे तिथे गुरुवारी लसीकरण होणार आहे.

‘रेमडेसेविरसाठी केंद्राने मदत करावी’

महाराष्ट्रात दर दिवसाला ५० हजार रेमडेसिविर इंजेक्शन मिळत आहेत. करोना रुग्ण वाढत असल्याने या सर्वांचा वापर होत आहे. त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शनसाठी केंद्राने मदत करावी, अशी मागणीही टोपे यांनी केली आहे. काही ठिकाणी गरज नसताना रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन दिले जात असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे डॉक्टरांनी बिल वाढवण्यासाठी असे करू नका. काही ठिकाणी रेमडेसिविरची किंमत ३ ते ४ हजार रुपये केली जात आहे. ते इंजेक्शन ११०० ते १४०० च्या वर विकू नका, असे ठरले होते. पण त्याचे पालन केले जात नसल्याचे दिसत असून यासाठी  एक समिती नेमली आहे. ती रेमडेसिविर इंजेक्शनची योग्य ती किंमत ठरवेल. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला.

राज्यात करोनाचे ५९,९०७ नवे रुग्ण

मुंबई  : राज्यात बुधवारी करोनाचे ५९,९०७ नवे रुग्ण आढळले. राज्यातील दैनंदिन रुग्णवाढीचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. दिवसभरात ३२२ जणांचा मृत्यू झाला. उपचाराधीन रुग्णांची संख्या पाच लाखांवर गेली. दिवसभरात मुंबईत १०,४२८ नव्या रुग्णांची नोंद झाली. राज्यात पाच लाखाहून अधिक उपचाराधीन रुग्ण असून, पुणे जिल्हा ९०,०४८, मुंबई ८३१३५, ठाणे ६५४३१, नाशिक ३३५७५, नागपूर ५९५९५ रुग्ण उपचाराधीन आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2021 12:30 am

Web Title: vaccine shortage in the state abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 चिथावणीला बळी पडू नका!
2 खंडणीचे आरोप निराधार : परब
3 करोना लशीच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करा -फडणवीस
Just Now!
X