News Flash

उद्यापासून पूर्वनोंदणीशिवाय लस

मुंबईत शनिवारी ३० ते ४४ वयोगटाचे लसीकरण दहा केंद्रांवर पूर्वनोंदणी करून वेळ आरक्षित केलेल्यांसाठीच खुले केले होते.

आजपासून सर्व प्रौढांना करोना प्रतिबंधक लस मोफत दिली जात आहे. (संग्रहित छायाचित्र)

मुंबई : शहरात शनिवारी दहा लसीकरण केंद्रांवर ३० ते ४४ वयोगटातील १७७८ जणांना कोव्हिशिल्डची पहिली मात्रा दिली गेली. सोमवारी या वयोगटासाठी पूर्वनोंदणीशिवाय लसीकरणाची सुविधाही सुरू असणार आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी होऊन रांगा लागण्याची शक्यता आहे.

मुंबईत शनिवारी ३० ते ४४ वयोगटाचे लसीकरण दहा केंद्रांवर पूर्वनोंदणी करून वेळ आरक्षित केलेल्यांसाठीच खुले केले होते. पूर्वनोंदणी आणि वेळ आरक्षित करूनच नागरिक आले होते. त्यामुळे गर्दी होणे किंवा गोंधळ होणे असे प्रकार शनिवारी घडले नाहीत.

मुंबईतील पालिकेच्या केंद्रावर सोमवार ते बुधवार ४५ वर्षांवरील नागरिकांचे पूर्वनोंदणीशिवाय आणि गुरुवार ते शनिवार पूर्वनोंदणी करूनच लसीकरण केले जाते. यात आता ३० ते ४४ वयोगटाचाही समावेश केलेला आहे. त्यामुळे २१ जून रोजी या वयोगटालाही पूर्वनोंदणी न करता लसीकरण करता येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2021 1:17 am

Web Title: vaccines without pre registration from tomorrow akp 94
Next Stories
1 वारकऱ्यांना यंदा थोडी मोकळीक!
2 मेट्रो २ आणि ७ च्या चाचण्या सुरू
3 विधि अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या पदवीचा पेच
Just Now!
X