News Flash

हिंदुत्ववादी वैभव राऊत याची अटक म्हणजे ‘मालेगाव पार्ट २’ – हिंदू जनजागृती समिती

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) नालासोपारा येथून वैभव राऊत याला अटक केली आहे

(संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) नालासोपारा येथून वैभव राऊत याला अटक केली असून त्याच्या घरातून आणि दुकानात काही संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले आहे. यात स्फोटकं बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा समावेश आहे. तसंच आठ देशी बॉम्बही मिळाले आहेत. दरम्यान हिंदू जनजागृती समितीने वैभव राऊतची अटक ही ‘मालेगाव पार्ट २’ असल्याची शंका येत असल्याचं म्हटलं आहे.

वैभव राऊत सनातन संस्थेचा साधक असल्याचा बातम्यांमध्ये उल्लेख आहेत. वैभव राऊत धडाडीचा गोरक्षक असून तो ‘हिंदू गोवंश रक्षा समिती’ या गोरक्षण करणाऱ्या संघटनेच्या माध्यमातून कार्यरत होता अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी दिली आहे.

वैभव राऊत हिंदू जनजागृती समितीच्या सर्व हिंदू संघटनांच्या एकत्रीकरणातून केल्या जाणार्‍या हिंदू संघटनाच्या उपक्रमांमध्ये, तसंच आंदोलनांमध्ये सहभागी होत असे; मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्याचा कोणत्याही उपक्रमात सहभाग नव्हता, असंही त्यांनी सांगितलं आहे.

हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना नाहक त्रास देणे, खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवणे यांसारख्या घटना आता नवीन नाहीत. मालेगाव प्रकरण, सनातन संस्थेच्या अनेक निष्पाप साधकांची अटक यांसारख्या प्रकरणांतून हे सिद्ध झाले आहे. आज येत असलेली वृत्ते पाहता वैभव राऊत याची अटक ही ‘मालेगाव पार्ट २’ आहे कि काय, अशी शंका येत आहे, असंही सुनील घनवट बोलले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2018 1:23 pm

Web Title: vaibhav raut arrest is malegaon part 2 says hindu janjagruti samiti
Next Stories
1 आजींच्या चोरीला गेलेल्या सोन्याच्या पाटल्या पोलीस अधिकाऱ्याने स्वखर्चाने दिल्या
2 वैभव राऊत सनातनचा साधक नसून एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता, सनातनच्या वकिलांचा दावा
3 सगळेच विरोधात असताना हे लोक जिंकतात कसे? : शिवसेनेचा भाजपावर नेम