केंद्रातील मोदी सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाले. पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर झाल्यापासूनच नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसला देशातून हद्दपार करून देशाचा विकास करण्याचं आश्वासन सामान्य जनतेला दिलं. त्यानंतर कॉंग्रेसची दहा वर्षांची सत्ता उलथवून आणि विकासाची स्वप्न दाखवत भाजप पक्ष सत्तेवर आला. परंतु, सरकारची वर्षभराची कामगिरी देशातील नागरिकांच्या अपेक्षा खरंच पूर्ण करू शकली का? मोदींनी निवडणुकीदरम्यान दिलेली आश्वासनं प्रत्यक्षात उतरायला सुरूवात झाली आहे का? जनता काय, निवडून आलेले उमेदवार आपल्या आणि सरकारच्या कामगिरीवर किती समाधानी आहेत, हे आम्ही थेट खासदारांशीच बोलून जाणून घेतले. त्याचसोबत विरोधी वर्ष सरकारच्या वर्षपूर्तीकडे कसे पाहते हेदेखील येथे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.