सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) विरोधात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनासाठी राज्यभरातून शेकडो  कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. दादरच्या खोदादाद सर्कल येथे हे आंदोलन सुरु आहे.

संसदेत सुधारित नागरिकत्व कायदा लागू झाल्यानंतर देशभरात याविरोधात आंदोलने सुरु झाली. या आंदोलनांचे सत्र अजूनही सुरुच आहे. दरम्यान, गुरुवारी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने दादरच्या खोदादाद सर्कले येथे धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनासाठी वाहतुकही इतर मार्गांनी वळवण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनासाठी मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दादर य़ेथील टीटी सर्कल येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या परिसरातील सर्व मार्केटही बंद करण्यात आले आहेत.