News Flash

महाराष्ट्राच्या राजकारणाचा उद्यापासून भविष्यवेध

देशातील सर्वात प्रगतीशील म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्याची भविष्यातील वाटचाल कशी असेल, याबाबत नेहमीच उत्सुकता असते.

‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ उपक्रमात प्रमुख नेत्यांशी संवाद

विविध राजकीय पक्ष, त्यांचे नेते यांची ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ हे सर्वसामान्यांसाठी नेहमी कुतूहलाचे, कधी कौतुकाचे आणि प्रसंगी क्रोधाचेही कारण राहिलेले आहे. महाराष्ट्र राज्य आपल्या स्थापनेचा ६१वा वर्धापन दिन साजरा करीत असताना आगामी काळात या प्रमुख पक्षांचे येत्या दहा वर्षांतील राजकारण कसे असेल हे उलगडून दाखवण्याचा प्रयत्न म्हणजे ‘लोकसत्ता’ची ही ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ ही दूर-संवादमाला. आगामी राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात अशा सहा पक्षांचे प्रमुख नेते या उपक्रमातील वेबसंवादात आपले विचार मांडतील.

देशातील सर्वात प्रगतीशील म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्याची भविष्यातील वाटचाल कशी असेल, याबाबत नेहमीच उत्सुकता असते. करोनामुळे  गेली दोन वर्षे राज्याला कठोर आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अन्य राज्यांची स्पर्धा असली तरी विदेशी गुंतवणुकीपासून औद्योगिक, सेवा क्षेत्र, वित्तीय क्षेत्र, स्थावर मालमत्ता यात महाराष्ट्र  नेहमीच आघाडीवर राहिले.

या पार्श्वभूमीवर पुढील दहा वर्षांत महाराष्ट्राची वाटचाल कोणत्या मार्गाने होईल, त्या वाटचालीतील राजकीय आव्हाने, आर्थिक व सामाजिक परिस्थिती याचा आढावा या नेतेमंडळींकडून घेतला जाणार आहे.

महाराष्ट्र राज्याच्या ६०व्या वर्धापन दिनानिमित्त गेल्या वर्षी झालेल्या ‘साठीचा गझल… महाराष्ट्राचा’ या वेबसंवाद कार्यक्रमात शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, अशोक चव्हाण या माजी मुख्यमंत्र्यांनी राज्याने कशी प्रगती केली याचा आढावा घेतला होता. ‘दृष्टी आणि कोन’ या वेबसंवादातून भविष्याचा वेध घेतला जाणार आहे.

 

सहा दिवसांत… पुढील आठवड्यात ३१ मेपासून ५ जूनपर्यंत दररोज सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या वेबसंवादात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे हे भूमिका मांडणार आहेत. समारोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संवादाने होईल.

प्रायोजक – ’प्रस्तुती :  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

’सहप्रायोजक : एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लि. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), कपॅसिटे इन्फ्रा प्रोजेक्ट्स लि.

 

विद्यार्थ्यांच्या नोंदणीत एवढा फरक दिसणे काळजीचे आहे. अनेक विद्यार्थी स्थलांतरामुळे या प्रवाहात राहिले नसल्याची शक्यता आहे. मात्र एवढा फरक का दिसतो, हे विद्यार्थी कुठे गेले याचा शोध घेणे महत्वाचे आहे. – वसंत काळपांडे, शिक्षणतज्ज्ञ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2021 2:04 am

Web Title: various political parties of maharashtra politics akp 94
Next Stories
1 मुंबईत पेट्रोल शंभरीपार
2 सुरक्षेसह हजारोंच्या आरोग्याचीही रक्षणकर्ती
3 इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या ७ वर
Just Now!
X