News Flash

वसई : राजावळीतील खदाणीत तरूण बुडाला

पोलीस व बचाव पथकाकडून शोध सुरू

वसई पूर्वेतील राजावळी येथील खदाणीत एक २० वर्षीय तरूण बुडल्याची घटना आज घडली आहे. पोलीस व अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, बुडलेल्या तरूणाचा शोध घेतला जात आहे.

राजावळी गावाच्या लगतच खदाण आहे. पावसाळा असल्याने ही खदाण पाण्याने काठोकाठ भरली आहे. या परिसरातील मोकळ्या रस्त्यावर सायकलिंग करण्यासाठी सोमवारी सकाळच्या सुमारास गोखीवरे येथील ५ ते ६ मुलांचा ग्रुप आला होता. सायकलिंग केल्यानंतर हे तरुण साडेआठ वाजेच्या सुमारास खदाणीत पोहण्यासाठी उतरले होते. दरम्यान, त्यातील अभिजित वानखेडे (२०) हा तरुण या खदाणीत बुडाला.

या घटनेची माहिती पोलिसांना कळवण्यात आल्यानंतर घटनास्थळी पोलीस व अग्निशमन दलाचे कर्मचारी दाखल झाले. सध्या बचाव पथकाकडून बुडालेल्या तरुणाचा शोध सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2020 4:25 pm

Web Title: vasai a young man drowned in a mine in rajivali msr 87
Next Stories
1 मिरा-भाईंदरमध्ये मनसे कार्यकर्त्यांची पालिका अधिकाऱ्याला मारहाण
2 “मोदींनी लंडनमध्ये जाऊन डॉक्टरांचा अपमान केला तेव्हा कुठे होतात?,” संजय राऊत यांचा टीकाकारांना सवाल
3 डॉक्टर देवदूतांसारखे, मी त्यांचा अपमान केलेला नाही; संजय राऊत यांचं स्पष्टीकरण
Just Now!
X