Advertisement

दुर्दैवी! करोनामुळे पतीचा मृत्यू, विरह सहन न झाल्याने पत्नीची आत्महत्या

देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी करोनाचं संकट काही कमी झालेलं नाही. अनेकांना आपल्या प्रियजणांना जीव वाचवण्यात अपयश येताना दिसत आहे.

देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी करोनाचं संकट काही कमी झालेलं नाही. अनेकांना आपल्या प्रियजणांना जीव वाचवण्यात अपयश येताना दिसत आहे. या दु:खामुळे अनेक जण टोकाचं पाऊल उचलताना दिसत आहेत. वसईत पतीचा करोनाने मृत्यू झाल्याचा धक्का सहन न झाल्याने पत्नीने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. मंगळवारी दुपारी वसईच्या मर्सेस येथे ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

वसईच्या मर्सेस गावात डिसिल्वा कुटुंबीय रहात होते. विवेक डीसल्वा (३९) हे काही दिवसांपूर्वी परराज्यात जावून आले होते. त्यांना करोनाची लागण झाली होती. त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या आई वडील आणि पत्नी स्वाती (३५) यांना देखील करोनाची लागण झाली. त्यांना उपचारासाठी वसईच्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, स्वाती या रुग्णालयातुन घरी आल्या होत्या. मंगळवारी सकाळी विवेक यांचा मृत्यू झाल्याचे त्यांना समजले. त्याचा मोठा मानसिक धक्का त्यांना बसला. यामुळे मंगळवारी दुपारी गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली.

लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर झाला करोना; मुंबईतील डॉक्टर तीन वेळा पॉझिटिव्ह

देशात गेल्या २४ तासांत २९ हजार ६८९ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ४१५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच ४२ हजार ३६३ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. यापूर्वी देशात सोमवारी ३९ हजार ३६१ आणि रविवारी ३९ हजार ७४२ नवीन करोना रुग्ण आढळले होते. त्यामुळे आजची आकडेवारी दिलासादायक आहे. तसेच देशात सक्रिय रुग्णसंख्येतही घट झाली आहे.

24
READ IN APP
X
X