उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याप्रकरणी अटकेत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे हे तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शुक्रवारी उच्च न्यायालयात केला. तसेच वाझे यांची चौकशी करण्यात अडचणी येत असल्याने चौकशीदरम्यान त्यांच्या वकिलांना हजर राहण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंतीही एनआयएने केली. न्यायालयाने मात्र असे आदेश दिले जाऊ शकत नसल्याचे सांगत एनआयएची मागणी फेटाळून लावली. चौकशीदरम्यान हजर राहता यावे यासाठी वकील एनआयएच्या कार्यालयाजवळील एका हॉटेलमध्ये थांबले होते. मात्र एनआयएतर्फे त्यांना संपर्कच साधण्यात आला नाही, असा दावा वाझे यांच्या वकिलातर्फे करण्यात आला.

‘एनआयए’चा संशय…

२५ फे ब्रुवारीला अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ गाडी बेवारस अवस्थेत आढळली. पुढे त्यात अडीच किलो जिलेटीन आणि अंबानी कु टुंबाला धमकावणारी चिठ्ठी आढळली. या परिसरातील सीसी टीव्ही चित्रणाचे विश्लेषण केले असता ही स्कॉर्पिओ वाझे यांनी चालवत आणली आणि अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ, कारमायकल रोडवर उभी के ली, असा संशय ‘एनआयए’ला आहे.

वाझेंकडे १२ गाड्या

एनआयए आणि एटीएसच्या तपासात अटक आरोपी वाझे एकूण १२ महागड्या गाड्या वापरत असल्याचे उघडकीस आले आहे. ही सर्व वाहने ते गुंतवणूकदार किं वा भागीदार असलेल्या तीन कं पन्यांच्या नावे आहेत, अशी माहिती पुढे आली. यापैकी दोन मर्सिडीज, एक लॅण्डक्रुजर प्रॅडो गाडी एनआयएने जप्त के ली आहे. अन्य नऊ गाड्यांचा वाझे यांनी गुन्ह््यात वापर के ला आहे का, याबाबत चौकशी-तपास सुरू आहे, असे एनआयएच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.