News Flash

वाझे यांचे तीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळले

वकिलाला भेटू देण्याच्या मागणीसह उपरोक्त तीन दाव्यांबाबत वाझे यांनी स्वतंत्र अर्ज केले होते.

सचिन वाझे (संग्रहित छायाचित्र। इंडियन एक्स्प्रेस)

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याच्या आरोपप्रकरणी अटकेत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे अटक बेकायदा असल्याचा, राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचा आणि पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्याचा दावा विशेष न्यायालयाने मंगळवारी फेटाळला.

त्याच वेळी वकिलाला भेटू देण्याची मागणी मात्र न्यायालयाने अंशत: मान्य केली. वाझे यांच्या चौकशीच्या वेळी वकिलांना सोबत राहण्याची मुभा न्यायालयाने दिली आहे.

वकिलाला भेटू देण्याच्या मागणीसह उपरोक्त तीन दाव्यांबाबत वाझे यांनी स्वतंत्र अर्ज केले होते.

वाझे तपासात सहकार्य करत नव्हते. त्यामुळेच त्यांना अटक केल्याचे एनआयएने सोमवारच्या सुनावणीत स्पष्ट केले होते. शिवाय चौकशीला येताना वाझे हे सोबत आपला भ्रमणध्वनी घेऊन आले नव्हते आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक देण्यासही त्यांनी नकार दिला होता. त्यामुळे अटकेच्या वेळी ते मुंबई पोलिसांच्या ज्या कार्यालयात कार्यरत होते तेथे संपर्क साधून त्यांच्या अटकेची माहिती देण्यात आल्याचा दावाही एनआयएने केला होता. वाझे यांना वकिलाला भेटू देण्यास आपली काहीच हरकत नसल्याचेही एनआयएने स्पष्ट केले होते.

वाझे यांनी केलेल्या अर्जांवर मंगळवारी सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने वकिलांबाबत वाझे यांनी केलेली मागणी अंशत: मान्य केली. तसेच वाझे हे पोलीस अधिकारी आहेत. त्यांना त्यांंचे अधिकार माहीत आहे आणि एनआयएने सादर केलेल्या कागदपत्रांवरून त्यांच्या अटके बाबत कळवण्यात आले होते, असे नमूद करत न्यायालयाने त्यांचे अन्य अर्ज फेटाळून लावले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 12:43 am

Web Title: vaze three applications were rejected by the special court abn 97
Next Stories
1 दिग्दर्शकाकडून खंडणी उकळल्याप्रकरणी अभिनेत्रीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल
2 गरज आणि करबचतीच्या समन्वयातून गुंतवणूक करा!
3 पालिकांच्या महासभा तूर्त आभासीच
Just Now!
X