News Flash

शिक्षक दिनी मुंबई विद्यापीठात ‘व्हीसी कनेक्ट’ची सुरुवात

शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठात ‘व्हीसी-कनेक्ट’ या मदतवाहिनीची सुरुवात करण्यात आली.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठात ‘व्हीसी-कनेक्ट’ या मदतवाहिनीची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थी तसेच विद्यापीठाशी संबंधित कुणालाही भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत थेट कुलगुरुंशी संपर्क साधण्याच्या उद्दिष्टाने ही मदतवाहिनी सुरू करण्यात आली आहे.
येत्या काळात मुंबई विद्यापीठ हे डिजिटल विद्यापीठ म्हणून ओळख देण्याच्या प्रयत्नात असलेले कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी शिक्षक दिनानिमित्त कालिना येथील फिरोजशाह मेहता भवना आयोजित कार्यक्रमात या मदतवाहिनीचे उद्घाटन केले.
विद्यार्थ्यांनी तसेच विद्यापीठाशी संबंधित कुणीही त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी helplineofmumbaiuniversityvc@gmail.comवर पाठवाव्यात. हा ई-मेल आयडी थेट कुलगुरूंच्या कार्यालयाशी जोडलेला असेल. यावर आलेल्या तक्रारींचे २४ तासांच्या आत निवारण कसे होईल यावर भर असेल असे डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2015 11:04 am

Web Title: vc connect in mu
Next Stories
1 मुख्यमंत्री मंगळवारी जपान दौऱ्यावर
2 हजारी कारंज्या’मुळे पारसिक बोगद्याला धोका?
3 कॉल ड्रॉपच्या पैशांची कंपनीकडूनच वसुली
Just Now!
X