News Flash

वाहन नोंदणीत १५ टक्क्यांची घट

वाहन उद्योग क्षेत्रातील मंदीचा परिणाम

(संग्रहित छायाचित्र)

वाहन उद्योग (ऑटोमोबाइल) क्षेत्रातील मंदीमुळे राज्यातील वाहन खरेदीत मोठी घट झाली आहे. परिणामी वाहन नोंदीत सुमारे १५ टक्क्यांची घसरण झाली असून, प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) उत्पन्नही घटले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्यात परिवहन विभागाला महसूल २०१५ पर्यंत पाच हजार ९७३ कोटी रुपये महसूल मिळत होता. त्यात २०१८-१९ पर्यंत वाढ होत गेली. त्या वेळी वाहन नोंदणीद्वारे परिवहन विभागाला आठ हजार ६७३ कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. यंदा (२०१९-२० मध्ये) वाहनांच्या नोंदणी आणि इतर करांद्वारे नोव्हेंबपर्यंत केवळ ५ हजार ४६६ कोटी रुपये परिवहन विभागाच्या तिजोरीत जमा झाले आहेत.

एप्रिल ते नोव्हेंबर २०१९ या काळात २३.१० लाख वाहनांची नोंदणी परिवहन विभागाकडे झाली आहे. गेल्या वर्षी मार्च २०१८ ते एप्रिल २०१९ या आर्थिक वर्षांत २७ लाख १४ हजार वाहनांची नोंदणी झाली होती. यंदा आकडेवारी पाहता त्यात घट झाली असून हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे परिवहन विभागाचा प्रयत्न आहे.

यंदा नोव्हेंबपर्यंत केवळ १६ लाख ९२ हजार नव्या दुचाकी वाहनांची नोंदणी झाली. गेल्या वर्षी याच काळात १९ लाख ६९ दुचाकींची राज्यात नोंदणी झाली होती. २०१९ मध्ये ३ लाख ६६ हजार चारचाकी वाहनांची खरेदी झाली, तर गेल्या वर्षी ३ लाख ९७ चारचाकी वाहने विकली गेली होती.

तीनचाकी वाहनांची नोंदणी गेल्या आर्थिक वर्षांत १ लाख ७२ हजार एवढी होती. यंदा त्यात घसरण होत ९५ हजार ८०८ तीनचाकी वाहनांची नोंदणी झाली. तर छोटय़ा मालवाहतूक वाहनांची नोंदणी २०१८ मध्ये ८० हजार ६३ इतकी झाली होती ती या वर्षी आत्तापर्यंत ७६ हजार १८२ इतकी झाली आहे.

मुंबईत ३६ लाख वाहने

* प्रादेशिक परिवहन विभागाची आकडेवारी पाहता राज्यात एकूण वाहने ३ कोटी ५३ लाख इतकी असून राज्याची लोकसंख्या ११ कोटी इतकी आहे. मुंबईत एकूण वाहनांची संख्या ३६ लाख १५ हजार १५७ इतकी झाली आहे.

* त्यात दुचाकीची संख्या २१ लाख २९ हजार ४५६, तर चारचाकी वाहन संख्या १० लाख ३१ हजार दोन इतकी झाली आहे. यंदा राज्यातील वाहन अपघातांमध्ये मात्र ७.४ टक्के इतकी घसरण झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2020 1:26 am

Web Title: vehicle registrations decrease by 15 abn 97
Next Stories
1 स्थानिक भाषेत प्रश्न सोडवणारा ‘स्पीच बॉक्स’
2 सीएसएमटी-पनवेल उन्नत जलद मार्ग ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ तत्त्वावर
3 जातीधर्माच्या पलीकडे जाणारा समाज निर्माण करा !
Just Now!
X