News Flash

ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे निधन

उत्तर प्रदेशात जन्मलेल्या सिक्री यांनी राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून अभिनयाचे शिक्षण घेतले.

मुंबई : करारी व्यक्तिमत्त्व आणि उत्तम अभिनयाच्या जोरावर एखाद्या लहान भूमिकेतही लक्षात राहाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्या ७५ वर्षांच्या होत्या.

गेले काही दिवस त्या आजारी होत्या. २०१८ मध्ये त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता. त्यानंतर २०२० मध्ये पुन्हा मेंदूचा पक्षाघात झाल्यामुळे त्यांचा आजार बळावला. शेवटपर्यंत आपल्याला चांगले काम करायला मिळावे असा त्यांचा ध्यास होता. तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सुरेखा सिक्री यांनी रंगभूमी, दूरचित्रवाणी आणि चित्रपट या तिन्ही माध्यमांत आदराचे स्थान निर्माण केले होते.

उत्तर प्रदेशात जन्मलेल्या सिक्री यांनी राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून अभिनयाचे शिक्षण घेतले. काही काळ याच संस्थेबरोबर काम केल्यावर त्या मुंबईत आल्या. १९७८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘किस्सा कु र्सी का’ हा त्यांचा पहिला चित्रपट. गोविंद निहलानी दिग्दर्शित ‘तमस’, श्याम बेनेगल यांचा ‘मम्मो’, ‘सरदारी बेगम’ यांसह ‘सलीम लंगडे पे मत रो’, ‘करामती कोट’, ‘सरफरोश’, ‘झुबेदा’ अशा अनेकचित्रपटांमधून त्या लक्षात राहिल्या. दूरचित्रवाणीवर दीर्घकाळ गाजलेल्या ‘बालिका वधू’ या मालिके तील त्यांची ‘दादीसा’ ही भूमिका लोकांच्या पसंतीस उतरली होती. नव्वदच्या दशकांत त्यांनी ‘बनेगी अपनी बात’, ‘जस्ट मोहोब्बत’सारख्या हलक्याफु लक्या मालिकांमधूनही काम के ले.

‘तमस’, ‘मम्मो’ आणि २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बधाई हो’ या चित्रपटांतील भूमिकांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हिंदी रंगभूमीवरील योगदानासाठी १९८९ मध्ये ‘संगीत नाटक अकादमी’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 12:02 am

Web Title: veteran actress surekha sikri passes away akp 94
Next Stories
1 राज्यपाल नियुक्त सदस्यांचा मुद्दा तापला; मुंबई उच्च न्यायालयानं थेट केंद्र सरकारकडे केली विचारणा!
2 ‘आम्ही तुमच्या सोबत, काळजी करू नका’ लोणकर कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांनी दिला धीर
3 “हर मोड़ पर गड्ढे-तालाब,” अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा साधला शिवसेनेवर निशाणा
Just Now!
X