ज्येष्ठ अभिनेत्री विमल घैसास यांचे वृद्धापकाळाने नुकतेच मुंबईत निधन झाले. त्या ९६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात ज्येष्ठ जावई मधुसूदन जोशी, कनिष्ठ कन्या सुधा कानडे, पद्मश्री विजय कदम, अलंकार, पल्लवी जोशी-अग्निहोत्री, अभिजित कानडे, संपदा स्वप्निल बांदोडकर ही नातवंडे असा परिवार आहे.
विमल घैसास यांनी ‘कुबेर’, ‘जरा जपून’, ‘कुंकवाचा धनी’, हिरवा चुडा’, ‘सप्तपदी’, ‘बाळा जो जो रे’, ‘श्यामची आई’, ‘बदला’ या मराठी तर ‘मोती’, ‘रुपयोंकी कहॉंनी’, ‘मै अबला नही हू’, ‘मजदूर’ या हिंदी तसेच ‘जोगीदास खुमांड’ या गुजराती चित्रपटात काम केले होते.
घैसास यांनी ‘कुलवधू’, ‘संत तुकाराम’, ‘संशयकल्लोळ’, ‘खडाष्टक’, ‘शेजारीपाजारी’, ‘सावळागोंधळ’, ‘पठ्ठे बापूराव’ आणि ‘तो मी नव्हेच’ आदी नाटकांतून भूमिका केल्या होत्या. ‘संत तुकाराम’नाटकातील त्यांच्या भूमिकेचे कौतूक झाले. त्याची दखल घेऊन बालगंधर्वानी त्यांना गंधर्व कंपनीत बोलावून घेतले. तिथे त्यांनी अनेक नाटकांतून काम केले.

Senior educationist writer Meena Chandavarkar passed away
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखिका मीना चंदावरकर यांचे निधन
Raghu Ram blames the MTV show for his divorce
“रोडीजमुळे माझा घटस्फोट झाला,” प्रसिद्ध अभिनेत्याचं विधान; म्हणाला, “माझ्या वैयक्तिक आयुष्यात…”
mai tumhe barbad kar dungi meme actress
लोकप्रिय गाणी व ‘राज’ सिनेमात इंटिमेट सीनमुळे राहिली चर्चेत; ‘या’ व्हायरल मीममधील अभिनेत्री अचानक गायब झाली अन्…
Mukta Barve and Madhugandha Kulkarni worked together Naach ga ghuma film for the first time after 20 years of frendship
२० वर्षांच्या मैत्रीत मुक्ता बर्वे आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी पहिल्यांदाच केलं एकत्र काम; ‘नाच गं घुमा’ चित्रपटामुळे मिळाली संधी