08 March 2021

News Flash

जगदीश औरंगाबादकर यांची आत्महत्या

सकाळी नऊ ते दुपारी साडेबाराच्या दरम्यान औरंगाबादकर यांनी आत्महत्या केली.

ज्येष्ठ चित्रपट छायाचित्रकार जगदीश औरंगाबादकर यांनी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. आत्महत्यचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.

दुपारी साडेबाराच्या सुमारास जेवणाचा डबा देणारी व्यक्ती औरंगाबादकर यांच्या घरी गेली असता हा प्रकार उघडकीस आला. औरंगाबादकर हे गोरेगाव येथील जयप्रकाशनगरातील आकृती सहकारी गृहनिर्माण संस्थेतील सदनिकेत गेल्या वर्षभरापासून एकटेच राहत होते.

सकाळी नऊ ते दुपारी साडेबाराच्या दरम्यान औरंगाबादकर यांनी आत्महत्या केली. औरंगाबादकर यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेले काही कागद पोलिसांना घटनास्थळी मिळाले असून त्यात त्यांनी कोणाचेही नाव घेतलेले नाही किंवा कोणाबद्दल तक्रारही केलेली नाही. औरंगाबादकर यांनी त्यांच्या काही मित्रांच्या नावाने ही पत्रे सहा वेगवेगळ्या भाषांत लिहून ठेवलेली होती. या प्रकरणी पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. औरंगाबादकर यांच्या घराचा दरवाजा उघडला जात नसल्याने डबा द्यायला आलेल्या व्यक्तीने सहकारी गृहनिर्माण संस्थेतील रहिवाशांना सांगितले. घटनास्थळी पोलीस आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. औरंगाबादकर यांच्या पार्थिवावर रात्री ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 3:07 am

Web Title: veteran film photographer jagdish aurangabadkar suicide
Next Stories
1 ‘आदर्श’ सोसायटीला आणखी एक धक्का
2 लोकसत्ता वृत्तवेध : मतांसाठी ‘माधव’, ‘मामुली’, ‘खाम’.. 
3 सेवाभावाला आश्वासक पाठबळ
Just Now!
X