News Flash

अग्रलेखांचे बादशाह निळकंठ खाडिलकर यांचं निधन

अग्रलेखांचा बादशाह खाडिलकर यांची ओळख होती.

ज्येष्ठ पत्रकार आणि अग्रलेखांचे बादशाह म्हणून ओळखले नीळकंठ खाडिलकर यांचं आज पहाटे अल्पशा आजारानं निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्यावर मुंबईतील लिलावती रूग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, त्यांचं पार्थिव दुपारी १२ ते २ या दरम्यान नवाकाळच्या गिरगाव येथील कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

अग्रलेखांचा बादशाह खाडिलकर यांची ओळख होती. तसंच दै. नवाकाळ या वृत्तपत्राचे ते अनेक वर्षे संपादकही होते. ६ एप्रिल १९३४ रोजी खाडिलकर यांचा जन्म झाला. अर्थशास्त्र विषयासह त्यांनी बी.ए.ऑनर्सचं शिक्षण पूर्ण केलं. अग्रलेखांव्यतिरिक्त एक उत्तम मुलाखतकार म्हणूनही त्यांची ओळख होती. गोळवलकर गुरूजी, सत्यसाईबाबा यांच्या त्यांनी घेतलेल्या मुलाखती फार गाजल्या होत्या. तसंच ते ज्येष्ठ नाटककार आणि ‘केसरी’चे माजी संपादक कृ.प्र.खाडिलकर यांचे नातू होते. दुपारी ३ वाजता मरीन लाईन्स येथील चंदनवाडी स्मशानभूमीत नीळकंठ खाडिलकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2019 8:25 am

Web Title: veteran journalist nilkanth khadilkar passes away former editor navakal newspaper jud 87
Next Stories
1 सहमती झाली, तरी सत्तावाटप अनिर्णित
2 शिवसेनेला मुख्यमंत्री पद देण्याची भाजपची तयारी
3 आमदारांच्या दबावामुळेच शिवसेनेला साथ देण्यास सोनिया गांधी तयार
Just Now!
X