02 March 2021

News Flash

ज्येष्ठ गायक मोहम्मद अझीझ यांचे मुंबईत निधन

८० आणि ९० च्या दशकात गाजलेल्या गायकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मोहम्मद अझीझ यांचे संग्रहित छायाचित्र

ज्येष्ठ गायक मोहम्मद अझीझ यांचे मुंबईतील नानावटी रूग्णालयात निधन झाले अशी माहिती समोर येते आहे. ८० आणि ९० च्या दशकातले एक नावाजलेले गायक म्हणून त्यांचा लौकिक होता. वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी रात्री त्यांचा कोलकाता येथे एक कार्यक्रम होता. मंगळवारी दुपारी ते मुंबई विमानतळावर पोहचले. त्यावेळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. टॅक्सीमध्ये त्यांनी चालकाला सांगितले की आपली प्रकृती ठीक नाही. त्यांना तातडीने नानावटी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी उपचार सुरु करण्याआधी त्यांचे निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. मुंबईत उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत अशीही माहिती मिळते आहे.

मोहम्मद अझीझ यांचा जन्म २ जुलै १९५४ ला पश्चिम बंगालच्या अशोक नगरमध्ये झाला होता. ‘दिल बहलता आपके आ जाने से’ या गाण्यामुळे अझीझ घराघरात पोहचले. मंगळवारी दुपारी एअरपोर्टवर जेव्हा मोहम्मद अझीझ उतरले तेव्हा त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा हार्ट अॅटॅकने मृत्यू झाला. अझीझ यांचा सेक्रेटरी बबलू यांनी ही माहिती दिली. १९८२ मध्ये गायक मोहम्मद अझीझ मुंबईत आले होते. मर्द टांगेवाला हे गाणे गाऊन त्यांनी अमिताभ बच्चन यांनाही आवाज दिला. हे गाणे मला मिळाले हा माझ्यासाठी भाग्याचा प्रसंग आहे अशी प्रतिक्रिया त्यावेळी अझीझ यांनी दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2018 6:57 pm

Web Title: veteran singer mohammad aziz passes away in mumbais nanavati hosptial
Next Stories
1 ‘आरक्षण मिळेपर्यंत आझाद मैदानावरचा ठिय्या सुरुच राहणार’
2 विरोधकांचा मराठा आरक्षणात अडथळा आणण्याचा प्रयत्न नाही : अजित पवार
3 दिलासादायक..! सहा आठवड्यात पेट्रोल १२ रूपयांनी स्वस्त
Just Now!
X