News Flash

अभिनेते मोहन भंडारी यांचे निधन

टीव्ही मालिकांमध्ये काम करणारे ज्येष्ठ अभिनेता मोहन भंडारी यांचे गुरुवारी संध्याकाळी निधन झाले.

टीव्ही मालिकांमध्ये काम करणारे ज्येष्ठ अभिनेता मोहन भंडारी यांचे गुरुवारी संध्याकाळी निधन झाले.
मोहन यांची प्रकृती गेले काही वर्ष ठीक नव्हती. त्यांना ब्रेन ट्युमर झाला होता. दूरदर्शन वाहिनीवरील ‘खानदान’ या प्रसिद्ध मालिकेव्यतिरीक्त त्यांनी ‘कर्ज’, ‘परंपरा’, ‘जीवन मृत्यू’, ‘पतझड’, ‘गुमराह’ या मालिकांमध्येही काम केले आहे. आमिरच्या ‘मंगल पांडे- द रायझिंग स्टार’ या चित्रपटातही ते झळकले होते. ‘तेरे शहर मे’ या मालिकेतून प्रसिद्धीस आलेला त्यांचा मुलगा ध्रुव याने आपल्या वडिलांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती काही महिन्यांपूर्वीच दिली होती.
८०च्या दशकात त्यांनी अनेक मालिकांमध्ये काम केले होते. मात्र, १९९४ मध्ये ते टीव्ही मालिकांपासून दुरावले. त्यानंतर त्यानी ‘सात फेरे’ या मालिकेने पुनरागमन केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2015 12:21 pm

Web Title: veteran tv actor mohan bhandari passes away
Next Stories
1 रुग्णाच्या नातेवाईकांची केईएममधील डॉक्टरांना सळईने मारहाण
2 परीक्षा अर्ज भरताना महाविद्यालयांची दमछाक
3 डेंग्यूच्या केवळ संशयानेच रुग्णालयातील खाटा फुल्ल!
Just Now!
X