News Flash

विदर्भात पुन्हा उष्णतेची लाट

विदर्भात पुन्हा एकदा उष्णतेही लाट आली असून नागपूरमध्ये रविवारी तब्बल ४५.३ अंश से. तापमान नोंदले गेले.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

विदर्भात पुन्हा एकदा उष्णतेही लाट आली असून नागपूरमध्ये रविवारी तब्बल ४५.३ अंश से. तापमान नोंदले गेले. नागपूरसह अकोला व वर्धा येथेही तापमान ४५ अंश से. वर राहिले. उष्णतेच्या या लाटेचा प्रभाव सोमवारीही राहील. मराठवाडय़ात कमाल तापमान ४१ ते ४३ अंश से. दरम्यान होते. मुंबईत ३३.६ अंश से. कमाल तापमानाची नोंद झाली.
एप्रिलपासून दर आठवडय़ात राज्यातील मराठवाडा, विदर्भ या भागात उष्णतेच्या लाटा येत आहेत. मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी उष्णतेच्या लाटेमुळे विदर्भातील तापमान ४५ अंश से.च्या घरात गेले. सर्वच जिल्ह्य़ांमध्ये तापमान ४३ अंश से. च्या वर राहिले. नागपूरमध्ये राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. वर्धा व अकोला येथे ४५ अंश, चंद्रपूर व ब्रह्मपुरीमध्ये ४४ अंश से. तापमान होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2016 2:31 am

Web Title: vidarbha temperature increase
टॅग : Temperature
Next Stories
1 राष्ट्रपतीपदक मिळाले नाही तरी प्रशंसनीय कामगिरी करणाऱ्या पोलिसांचा सन्मान
2 भाजपच्या व्यासपीठावर संजय दत्त!
3 न्यायालयाने फटकारूनही झेंडे
Just Now!
X