News Flash

Video : मुंबईत दिवसाढवळ्या वकिलावर तलवारीने हल्ला; धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

८ जुलै रोजी बोरिवली पश्चिम भागात ही घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे

५ ते ६ जणांनी तलवार आणि लाकडी दांडक्याच्या साहाय्याने वकिलाला मारहाण केली

मुंबईच्या बोरिवली भागात सत्यदेव जोशी नावाच्या वकीलावर गुंडांच्या टोळक्याने भरदिवसा हल्ला केला. जोशी यांच्यावर गुंडांनी लाठी-तलवारींनी हल्ला करत वार केले. हल्ल्यामुळे जोशी यांना दुखापतीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबईतील एका वकिलाने हल्ल्याचा व्हिडिओ ट्विटवर पोस्ट केला आहे. आहे. “अ‍ॅड.सत्यदेव जोशी यांच्यावर आज तलवार आणि अशा प्राणघातक शस्त्रे घेऊन कांदिवली येथे स्थानिक गुंडांनी हल्ला केला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,” असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

या हल्ल्यामध्ये सत्यदेव जोशी गंभीर जखमी झाले आहेत. ८ जुलै रोजी बोरिवली पश्चिम भागात ही घटना घडली होती. एमएचबी पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. कलम ३०७, ३२६,३२४, ५०४ आणि ५०६ अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. वकिलावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला आहे.

हे प्रकरण जमिनीच्या वादातून घडले असल्याचे सांगण्यात येत आहे. धक्कादायक व्हिडिओमध्ये ५ ते ६ जणांचा एक गट वकिलाभोवती उभे राहून मारहाण करत आहे. दरम्यान आजूबाजूला असलेले लोक मुकाट्याने उभे आहेत आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत नसल्याचे दिसून आले आहे.

वकिलांवर दिवसाढवळ्या झालेल्या हल्ल्यामुळे मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. या हल्ल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून गुन्हाही नोंदविण्यात आला आहे., अशी माहिती मुंबई पोलिसांनी एएनआयना दिली आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2021 2:47 pm

Web Title: video sword attack on lawyer in mumbai in broad daylight shocking incident captured on camera abn 97
Next Stories
1 अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जचं मुख्यालय मुंबईतून गुजरातला स्थलांतरित
2 “पेगॅसस सॉफ्टवेअर सरकारने विकत घेतलं आणि…”; जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली शंका
3 हे मुंबईवरील मोठ्या संकटाचे संकेत तर नाही ना?; शेलारांनी ठाकरे सरकारकडे व्यक्त केली भीती
Just Now!
X