मुंबईमधली गेट वे ऑफ इंडिया ही वास्तू तुम्ही बघितली असेल. पण ही भव्य वास्तू उभारायच्या आधी एक सहा फूट उंचीची मिनी गेट वे ऑफ इंडियाची प्रतिकृती बनवण्यात आली होती. रावबहादूर यशवंत देसाई हे त्यावेळचे प्रख्यात इंजिनीअर होते. त्यांच्या देखरेखीखाली ही वास्तू बांधण्यात आली होती. आजही मिनी गेट वे ऑफ इंडिया भेंडी गल्लीतील रावबहादूर देसाईंच्या वास्तूतील गॅरेजमध्ये जतन केलेला आहे… ही कलाकृती दाखवतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर.