News Flash

प्रसिद्ध गणेश मूर्तीकार विजय खातू यांचे निधन

हृदयविकाराच्या झटक्याने निधन

प्रसिद्ध गणेश मूर्तीकार विजय खातू यांचे निधन. (छायाचित्र: सौजन्य फेसबुक)

मुंबईतील प्रसिद्ध गणेश मूर्तीकार विजय खातू यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दादर येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ते ६३ वर्षांचे होते. त्यांच्यावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मूर्तिकलेचा वारसा समृद्धपणे चालवणाऱ्या विजय खातू यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांतील मूर्ती साकारण्यात त्यांचा हातखंडा होता. मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रातील मूर्तिकलाक्षेत्रात त्यांचे नाव आदराने घेतले जात होते. मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळासह अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील गणेशाच्या मूर्तीही त्यांनी घडवल्या आहेत. मूर्तिकलेचा वारसा समृद्ध करणाऱ्या मूर्तिकारांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. जवळपास ४६ वर्षांपासून ते या व्यवसायात होते.

वयाच्या चौदा-पंधराव्या वर्षीच त्यांनी या क्षेत्रात स्वतंत्रपणे काम करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी ते सातवी इयत्तेत शिकत होते. दुकानांवरील फलक रंगवण्याचे काम ते सुरुवातीला करत असत. फावल्या वेळेत ते गणपतीच्या मूर्ती साकारत असत. त्यांचे दोन भाऊही त्यांना या कामात त्यांना मदत करत होते. गणेशमूर्तीमधील हावभाव आणि डोळ्यांची आकर्षक आखणी हे त्यांच्या मूर्तीकलेचे वैशिष्ट्य होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2017 12:51 pm

Web Title: vijay khatu world famous ganesh idol sculptor passed away in mumbai
Next Stories
1 घाटकोपर इमारत दुर्घटनेप्रकरणी शिवसेना पदाधिकारी सुनील शितपला अटक
2 पहिल्या पसंतीला नकारघंटा कायम!
3 प्रसिद्धीच्या शिबिरांमुळे रक्तदान व्यर्थ!
Just Now!
X