आजवर आपण अनेक वेळा शहराचा इतिहास आणि त्याचा झालेला विकास पुस्तकामध्ये वाचतो, मात्र विलेपार्ले शहराचा इतिहास आणि त्याचा झालेला बदल भिंतीवर चित्ररूपाने लोकांपुढे मांडण्यात आला आहे. विलेपार्ले पूर्व येथील हॅपी होम सोसायटीच्या भिंतीवर चित्रांच्या माध्यमातून शहराचा इतिहास सजीव करण्याचा प्रयत्न केला आहे.

विलेपार्ले शहर सांस्कृतिक शहर म्हणून ओळखला जातो, त्यामुळे विलेपार्लेचा ऐतिहासिक वारसा शहरातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या प्रभागातील नगरसेविका ज्योती अळवणी यांनी आपल्या नगरसेवक निधीतून ही योजना अमलात आणली. या भिंतीवर दीनानाथ मंगेशकर सभागृह, साठय़े महाविद्यालय, टिळक मंदिर, पार्ले टिळक नवीन शाळा, देरासार महात्मा गांधी रस्ता अशा वेगवेगळ्या एकूण ३० पेक्षा जास्त चित्रांचा सामावेश आहे.

indian chess players performance in candidates chess
ऐतिहासिक सांगतेकडे..
girl brother attempt to kidnapped midc police saved abducted youth life
कारमध्ये कोंबून प्रेयसीच्या भावाचे अपहरण….पण,  खुनाचा प्रयत्न करताच….
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…
live-in partner killed and hung the body on tree
नागपूर : खून करून झाडाला लटकवला मृतदेह, लिव्ह इन पार्टनरचा बनाव…

१०० वर्षांपूर्वीच्या विलेपार्लेचा इतिहास आणि सध्याचे विलेपार्ले यातील फरक दाखविण्यासाठी हे चित्र काढण्यात आले आहेत. विलेपार्ले शहर पूर्वी लहान बंगल्यासाठी प्रसिद्ध होता. म्हणून या शहराला विलेपार्ले असे नाव देण्यात आल्याचे सांगण्यात येते. याचप्रमाणे सध्याच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहाच्या वास्तूवर पूर्वी मोर बंगला होता, त्या बंगल्याचे चित्रही या भिंतींवर पाहता येईल, तसेच १९२४ ला बांधण्यात आलेले जुने टिळक मंदिर, पार्लेश्वर मंदिराचे चित्र आणि अशा अनेक ऐतिहासिक वास्तू आपल्याला चित्र रुपात पाहायला मिळतील. दोन कलाकार गेल्या महिन्याभरापासून या भिंती रंगविण्याचे काम करीत होते आणि ती पूर्णदेखील झालेली आहे.