१८ च्या मोच्र्यात शिवसेना-कम्युनिस्ट एकत्र, दोन दिवस औद्योगिक बंद
एकेकाळी राजकीय अस्तित्वासाठी गिरणगावात ज्यांचा परस्परांशी घनघोर संघर्ष झाला आणि अजूनही तो कडवटपणा गेलेला नसताना केंद्र सरकारच्या कामगार, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेच्या विरोधातील धोरणांच्या विरोधात लढण्यासाठी कम्युनिस्ट आणि शिवसेना यांची अभूतपूर्व अशी एकजूट झाली आहे. कामगारांच्या प्रश्नावर कम्युनिस्ट व शिवसेना यांच्यासह इतर पक्षांशी सलग्न कामगार संघटनांचा १८ मार्चला विराट मोर्चा आझाद मैदानावर धडकणार आहे. तर याच प्रश्नावर २० व २१ फेब्रुवारीला पुकारण्यात आलेल्या औद्योगिक बंदसाठीही सारे डावे-उजवे पक्ष व संघटना मैदानात उतरणार आहेत.
केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारची धोरणे सर्वसामान्य माणसाला जगणे मुश्किल करून सोडणारी  आहेत. डिझेल, पेट्रोल, गॅसदरवाढ आणि सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या महागाईचा कामगार, कष्टकरी व मध्यवर्गीयांना फटका बसत आहे. त्याचा निषेध म्हणून देशव्यापी आंदोलन करण्यासाठी आयटक या कम्युनिस्टप्रणित कामगार संघटनेने पुढाकार घेतला. केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या विरोधातील आंदोलनाची व्याप्ती व तीव्रता वाढविण्यासाठी आयटकने सर्वच पक्षांच्या कामगार संघटनांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याला डाव्या-उजव्या सर्वच पक्षांशी सलग्न कामगार संघटनांनी समर्थन देत थेट आंदोलनातही उतरण्याची तयारी केली आहे.
मुंबईत, विशेषत: गिरणगावतच १९७० च्या दशकात कम्युनिस्ट व शिवसेना यांच्यात घनघोर संघर्ष झाला होता. शिवसेना व कम्युनिस्ट यांच्यातील वैचारिक मतभेदही टोकाचे आहेत. अशा परिस्थितीत आता केंद्र सरकारच्या विरोधातील आंदोलनात कम्युनिस्टप्रणिक आयटक, सिटू, शिवसेनेची भारतीय कामगार सेना, भाजपशी सलग्न भारतीय मजदूर संघ, काँग्रेसप्रणित इंटक अशा सर्वच डाव्या-उजव्या विचारांच्या संघटना एकत्र येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून १८ फेब्रुवारीला भायखळा येथील जिजामाता उद्यानापासून ते  आझाद मैदानापर्यंत कामगारांचा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.
२० व २१ फेब्रुवारीचा औद्योगिक बंदही यशस्वी करण्याची पूर्ण तयारी केली आहे, असे भाकपचे नेते प्रकाश रेड्डी यांनी सांगितले.

Dindori, Mahavikas Aghadi,
दिंडोरीत महाविकास आघाडीतील बंड रोखण्याची धडपड, माकपची जयंत पाटील यांच्याकडून मनधरणी
Lok Sabha Election, Lok Sabha Election 2024,
डोके ठिकाणावर ठेवून मतदान कराल ना?
bsp mayavati
भाजप सत्तेत परतणे कठीण! मायावती यांच्या लोकसभा प्रचाराला सुरुवात
Government Initiatives For Women's Safety
महिलांनो, तुमच्या सुरक्षेसाठी सरकारचे ‘हे’ उपक्रम ठरतात फायदेशीर; आपत्कालीन परिस्थितीत ही यादी जवळ ठेवाच!