News Flash

विनायक मेटेंनी दिला शिवस्मारक समिती अध्यक्षपदाचा राजीनामा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं पत्र, जाणून घ्या काय म्हटले आहे पत्रात

शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समन्वय समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांनी याबाबत कळवलं आहे. तसेच, शिवस्मारकाचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हाव, अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे.

आपल्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम लवकरात लवकर पूर्ण होवो, अशी सदिच्छा व्यक्त करत या कामात माझी काही आवश्यकता भविष्यात भासल्यास माझे सदैव सहकार्य राहील, असं मेटेंनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समन्वय समितीच्या अध्यक्षपदी विनायक मेटे यांची नियुक्ती २०१५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र, आता राज्यात सत्ता बदल झालेला असल्याने मेटे यांनी राजीनामा दिलेला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या नेतृत्वात राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आलेले असल्याने, आपल्या विचारानुसारच इतर विकासाची कामं होणं अपेक्षित आहे. याचप्रमाणे शिवस्मारकाचे काम देखील आपल्या विचाराने व्हावे म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प अंमलबजावणी, देखरेख आणि समन्वय समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. कृपया आपण राजीनामा स्वीकार करावा ही विनंती, असं मेटे यांनी पत्रात म्हटलेलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2020 6:51 pm

Web Title: vinayak mete resigns as chairman of shiv smarak committee msr 87
Next Stories
1 “मनसेच्या जीवावर मोठे झालेल्यांनी आम्हाला शिकवण्याचा आगाऊपणा करु नये”
2 एसी लोकल नको रे बाबा!
3 मुंबई महापालिका अर्थसंकल्प : उत्पन्नात घट; खर्च भरमसाट!
Just Now!
X