माजी क्रिकेटर विनोद कांबळी आणि त्याची पत्नीने मोलकरणीला मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पगार मागितला म्हणून विनोद कांबळी व त्याची पत्नी अँड्रिया या दोघांनी बेदम मारहाण  केल्याचा आरोप विनोद कांबळीच्या मोलकरणीने केला आहे.
विनोद कांबळीच्या घरी काम करणा-या मोलकरणीचा व कांबळी दाम्पत्यामध्ये पगारावरुन वाद होता. मोलकरणीने कांबळी दाम्पत्याकडे पगारवाढ मागितली होती. यानंतर कांबळी दाम्पत्याने तीन दिवस एका खोलीत डांबून ठेवले व मारहाण केली असा आरोप त्यांच्या मोलकरणीने केला आहे. वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून, भारतीय दंडविधान ३४२, ५०४, ५०६ आणि ३४ कलमान्वये त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.