महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगेसचा पाठिंबा घेऊन कोणतीही एक लोकसभा लढवा आणि डिपॉझिट वाचूवन दाखवा, असे आव्हान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या बैठकीत केलेल्या विधानावर उत्तर देताना तावडे म्हणाले की, आज रंगशारदामध्ये जेथे अनेक नाटके होतात. त्यात अजून एक नाटक पहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीचा पोपट म्हणाले होते. त्याला अधोरेखित करणारे आजचे भाषण होते. मला आता मनसेला म्हणायचे आहे की, तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन कोणतीही एक लोकसभा लढा आणि डिपॉझिट वाचवून दाखवा.

राज ठाकरे हे अतिशय सुज्ञ नेते आहेत. तरीसुध्दा आपल्या सैन्यांनी जी कामगिरी केली, त्यावर अशा पध्दतीने बोलणे हा सैन्याचा अपमान आहे. खऱ्या अर्थाने पाकिस्तानचे ते हिरो होऊ इच्छितात का? असा प्रश्न सामान्य माणसाच्या मनात येईल. पोपटाचा रंग हिरवा असतो तो पाकिस्तानचा तरी नाही ना असे मला वाटते, असा उपरोधिक टोला तावडे यांनी लगावला.