News Flash

उच्च व तंत्रशिक्षण खात्यांची संगणक खरेदी प्रक्रिया अपूर्ण

खरेदी प्रक्रिया रद्द करण्याची सचिवांची शिफारस

शिक्षणमंत्री विनोद तावडे ( संग्रहीत छायाचित्र )

विनोद तावडे यांची अद्याप मंजुरी नाही; खरेदी प्रक्रिया रद्द करण्याची सचिवांची शिफारस

तंत्रशिक्षण संचालकांकडून महाविद्यालयांसाठी सुमारे साडेचार हजार संगणकांच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया करण्यात आली असली तरी अद्याप खरेदी प्रक्रिया अपूर्ण असून तावडे यांनी त्यास मंजुरी दिलेली नाही. माहिती व तंत्रज्ञान महामंडळाकडून करण्यात येत असलेल्या खरेदीतील दरांपेक्षा जादा दर देण्यात आल्याने ही निविदा प्रक्रिया रद्द करून महामंडळाकडूनच संगणक घ्यावेत, अशी शिफारस अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी तावडे यांच्याकडे केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. तावडे यांनी महागडय़ा संगणक खरेदीस मान्यता दिलेली नसून यासंदर्भात काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला व ‘नो कमेंट्स’ एवढेच सांगितले.

तंत्रशिक्षण संचालकांकडून राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत आय ३ व आय ५ या संगणकांसाठी माहिती व तंत्रज्ञान महामंडळाला देण्यात आलेल्या दरांपेक्षा १२-१४ हजार रुपये अधिक दर देण्यात आला आहे. कंपन्यांनी शासनाच्या दोन खात्यांना वेगवेगळे दर कसे दिले हा प्रश्न असल्याने महाग दराने संगणक घेऊ नयेत, अशी शिफारस सचिवांनी केली असल्याचे समजते. निविदा प्रक्रिया राबविणाऱ्या संचालकांनी आपल्या पातळीवर निर्णय न घेता खरेदीबाबतचा प्रस्ताव अतिरिक्त मुख्य सचिव व मंत्र्यांकडे पाठविला आहे.ही फाइल तावडे यांच्या मंजुरीसाठी प्रलंबित असून त्यांनी महागडय़ा दराने संगणक खरेदी करण्यास मंजुरी दिलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2017 2:01 am

Web Title: vinod tawde comment on computer buying process
Next Stories
1 शिक्षकेतर कर्मचाऱ्याकडून उत्तरपत्रिका मूल्यांकन
2 मुंबई विद्यापीठाला उत्तरपत्रिकांचा हिशोब लागेना
3 घाटकोपर इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत
Just Now!
X