आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रात विठ्ठलनामाचा गजर होत आहे. पहाटेपासून लोकांनी विठ्ठल-रुक्मिनीच्या दर्शनासाठी विविध ठिकाणच्या मंदिरांमध्ये रांगा लावल्या आहेत. पंढरपूरात तर लाखो भाविकांसह मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक विठुरायाचे दर्शन घेतले. त्याचबरोबर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पहाटे सपत्नीक वडाळ्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या विठ्ठल मंदिरात जाऊन विठ्ठल-रखुमाईची विधीवत पूजा केली.

यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला सुखी, समृद्ध आणि निरोगी ठेव तसेच मुंबईकरांना सुखी-समाधीनी राहू अशी प्रार्थना त्यांनी विठ्ठलाकडे केली. मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरात जे मागणं आज विठ्ठलाकडे मागितलं तेच मागणं मी ही आज विठ्ठलाकडे मागितल्याचे तावडे यावेळी म्हणाले.