राज्यातील २४ टोलनाके बंद करण्याची शिफारस शासकीय समितीने दोन वर्षांपूर्वी करूनही मुख्यमंत्र्यांनी काय केले, असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केला आहे.
तसेच सत्ताधारी पक्षांच्या आमदारांना देण्यात येणारा प्रत्येकी १० कोटी रुपयांचा विकास निधी परत घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्यास सुमारे १६०० कोटी रुपये सरकारी तिजोरीत येतील आणि अनेक टोलनाके बंद करता येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 14, 2014 3:14 am
Web Title: vinod tawde questions on closing 24 toll