News Flash

विरार : पोलिसांच्या गाडीसह इतर वाहनांना धडक दिल्यानंतर वाहन सोडून चालक फरार

घटना सीसीटीव्हीमध्ये कैद; आरोपी चालकाचा शोध सुरू

विरारमध्ये रविवारी दुपारी एका अज्ञात वाहनाने भरधाव वेगात येऊन पोलिसांच्या गाडीसह इतर वाहनांना जोरदार धडक दिली. यात पोलिसांच्या गाडीसह इतर चार मोटार सायकलीचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटने संदर्भात विरार पोलीस ठाण्यात फरार वाहनचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विरार पूर्व साईनाथ परिसरात एका मारुती सियाज  (एमएच ४७ ए ५८९७) कारने विरार स्थानकाकडून महामार्गाच्या दिशेने जात असताना, विरारच्या दिशेने जाणाऱ्या पोलिसांच्या गाडीला जोरदार धडक दिली. यानंतर रस्त्यावर उभ्या असलेल्या इतर वाहनांना धडक देत घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी या गाडीचा पाठलाग केला असता पुढे काही अंतरावर चालक गाडी सोडून पसार झाला होता.

स्थानिकांनी माहिती दिली की या कारचा चालक दारूच्या नशेत होता. अपघातात पोलिसांच्या वाहनासह चार मोटार सायकलचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या संदर्भात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला असून आरोपी चालकाचा पोलीस शोध घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2020 5:12 pm

Web Title: virar a drunken driver absconded after hitting a police vehicle and other vehicles msr 87
Next Stories
1 धारावी पॅटर्नची पुन्हा एकदा जागतिक स्तरावर दखल, वॉशिंग्टन पोस्टकडून कौतुक; म्हणाले…
2 समुद्रात गणेश विसर्जनावर बंदी घाला
3 दृष्टिहिनांसाठी ‘व्हिजन बियॉण्ड’ची निर्मिती
Just Now!
X