20 January 2021

News Flash

विरुष्काचं टेन्शन वाढलं; आली कायदेशीर नोटीस…

या कायदेशीर नोटिशीला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा काय उत्तर देणार, याची प्रतिक्षा आहे.

रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या अरहान सिंग नामक व्यक्तीला खडेबोल सुनावतानाचा अभिनेत्री अनुष्का शर्माचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी तिचा पती आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या प्रकरणी कचरा फेकणारा व्यक्ती अरहान सिंग याने अनुष्का आणि विराटला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. विराट आणि अनुष्का या दोघांनीही माझी माफी मागावी, अशी मागणी त्याने या नोटिशीत केली आहे.

प्रसारमाध्यमांना माहिती देताना अरहान म्हणाला की माझ्या कायदेविषयक सल्लागाराने विराट कोहली आणि अनुष्का शर्मा कोहली या दोघांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यांनी माझी माफी मागावी, असे त्या नोटिशीत नमूद केले आहे. आता निर्णय त्यांना घ्यायचा आहे. या नोटिशीला ते जो पर्यंत काही उत्तर देत नाहीत, तो पर्यंत मी त्याच्या प्रतिसादाची वाट पाहण्याचा निर्णय घेतला आहे. या पेक्षा जास्त मी काही बोलू इच्छित नाही, असे त्याने स्पष्ट केले आहे.

काय आहे प्रकरण –

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे गाडीतून प्रवास करत होते. त्यावेळी अरहान सिंग नावाच्या व्यक्तीने रिकामी प्लास्टिकची बाटली रस्त्यावर फेकली. ही गोष्ट अनुष्काने पाहिली. त्यानंतर अनुष्काने त्या व्यक्तीची चांगलीच कानउघाडणी केली आणि ‘कचरा हा रस्त्यावर न फेकता कचराकुंडीत टाका’, असा त्याला सज्जड दम भरला.

दरम्यान, तिच्या या रौद्र रूपाचे विराटने चित्रीकरण केले आणि तो व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला. त्याच्या या व्हिडीओला अनेकांनी आपली पसंती दर्शवली. तसेच, चाहत्यांनी अनुष्काचे तोंडभरून कौतुक केले. तसेच, या वर्तणुकीबद्दल अरहानवर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली.

त्यानंतर अनुष्काने ही गोष्ट मला नम्रपणे समजावून सांगायला हवी होती. तसे झाले असते, तर मला अधिक बरे वाटले असते. तसेच, विराटानेही तो व्हिडीओ पोस्ट करायला नको होता, अशी प्रतिक्रिया अरहानने व्यक्त केली होती. तर अनुष्काने हे सारे केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी केल्याची टीका अरहानच्या आईने केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2018 9:53 pm

Web Title: virat kohli anushka sharma legal notice littering row arhaan singh
Next Stories
1 Hockey Champions Trophy – भारताचा विजयी चौकार, सलामीच्या सामन्यात पाकिस्तानवर ४-० ने मात
2 यो-यो टेस्ट पास करणाऱ्यालाच टीम इंडियात स्थान-रवी शास्त्री
3 दुबई मास्टर्स कबड्डी २०१८ – सलामीच्या सामन्यात भारताची पाकिस्तानवर मात
Just Now!
X