प्रसिद्ध स्टंट दिग्दर्शक आणि अभिनेता अजय देवगण याचे वडील वीरू देवगण यांना गुरुवारी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना न्यूमोनिया झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांचे निकटवर्तीय आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.

बॉलीवूडमध्ये ऐंशीहून अधिक चित्रपटांसाठी स्टंट दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या वीरू देवगण यांची प्रकृती काही दिवसांपासून बिघडली होती. न्यूमोनियाचे निदान झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.