27 February 2021

News Flash

विदर्भातील विषाणू स्थानिकच!

आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण

(संग्रहित छायाचित्र)

 

अमरावती, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये परदेशात आढळणाऱ्या विषाणूचा कोणताही प्रकार आढळलेला नाही, असे आरोग्य विभागाने शुक्र वारी स्पष्ट केले.

या दोन जिल्ह्य़ांप्रमाणेच सातारा आणि पुणे अशा राज्यांमधील काही जिल्ह्य़ांमध्ये गेल्या आठवडय़ापासून करोना रुग्णांच्या दैनंदिन संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. या वाढीची कारणे शोधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. या भागातील करोना विषाणूच्या जनुकीय रचनेमध्ये काही बदल झालेला आहे का, या संदर्भातही पाहणी करण्यात येत असल्याचेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले. अमरावती, यवतमाळ जिल्ह्य़ातील करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ब्रिटनमध्ये आढळलेल्या विषाणूचा या भागात प्रादुर्भाव झाल्याच्या चर्चेने लोकांमध्ये घबराट पसरली आहे. आरोग्य विभागाने मात्र ही शक्यता फे टाळून लावली.

पुण्यातील १२ नमुने देखील या वैद्यकीय महाविद्यालयात तपासण्यात आले असून त्यामध्येही जनुकीय क्रमामध्ये कोणतेही बदल दिसून आलेले नाहीत. तरीही  अधिक तपासणी सुरू असून अकोला, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्य़ांतील आणखी काही नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था, पुणे या ठिकाणी जनुकीय तपासणी करता पाठवण्यात आले आहेत. या संदर्भातील सविस्तर अहवाल पुढील आठवडय़ापर्यंत मिळण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले.

तपासणीचे निष्कर्ष..

आतापर्यंत अमरावती,यवतमाळ, सातारा या भागातील प्रत्येकी चार नमुने पुणे येथील बी जे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तपासण्यात आले असून या नमुन्यांच्या तपासणी अहवालानुसार या जिल्ह्य़ांमधील विषाणूमध्ये ब्रिटन, दक्षिण आफ्रिका किंवा ब्राझील या देशांमध्ये आढळलेल्या नवीन विषाणू प्रकारासारखा कोणताही बदल दिसून आलेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2021 12:09 am

Web Title: virus in vidarbha is local department of health explanation abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 सीएसएमटी ते ठाणे भुयारी रेल्वे बासनात?
2 रेल्वे हद्दीत अ‍ॅपआधारित बससेवा
3 करोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा
Just Now!
X