24 November 2020

News Flash

विश्वास पाटील यांच्या काळातील ३३ प्रकरणांची चौकशी अंतिम टप्प्यात

अनियमितता असलेल्या फाईल्स

जुहू येथील डॉ. ए. बी. नायर मार्गावर पटेलवाडी या शासकीय भूखंडावर अगदी जुहू बीचला लागून एकता रहिवासी संघ गृहनिर्माण संस्थेचा झोपु योजनेचा प्रस्ताव विकासक मे. जुहू बीच कॉर्पोरेशन यांनी २८ ऑगस्ट २००३ मध्ये सादर केला होता.

सेवानिवृत्त होण्याच्या शेवटच्या कोळात असंख्य फायली निकालात काढण्याची गतिमानता दाखविणारे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांच्या काळातील ३३ प्रकरणांत झालेल्या अनियमिततेची चौकशी अंतिम टप्प्यात असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. या चौकशीत प्राधिकरणातील अनेक अभियंत्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.पाटील यांच्या फायली निकाली काढण्याच्या गतिमानतेचे वृत्त ३ व ४ जुलै २०१७ रोजी सर्वप्रथम ‘लोकसत्ता’ने दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले. नवे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांनी या प्रकरणी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आणि या प्रकरणी चौकशी सुरू केली. ३३ प्रकरणात गंभीर त्रुटी असल्याचा अहवाल समितीने दिला. त्यानंतर या  प्रत्येक प्रकरणाची स्वतंत्र चौकशी प्राधिकरणाचे सचिव संदीप देशमुख यांनी सुरू केली. या प्रकरणी उपअभियंता, सहअभियंता, कार्यकारी अभियंता, उपमुख्य अभियंता व वास्तुरचनाकार आदींकडून या प्रकरणी लेखी खुलासे घेण्यात आले आहेत. या प्रत्येक फायलीची स्वतंत्र चौकशी सुरू असून या ३३ प्रकरणांत प्रत्येक फायलीत घोटाळे असल्याचे दिसून येत आहे. झोपु योजना मंजुरीला किमान तीन ते सहा महिने लागत असताना ३० जूनला निवृत्त होण्यापूर्वी दोन तीन दिवसात ज्या वेगाने फायली मंजूर केल्या गेल्या तो प्रवास थक्क करणारा असल्याचेही या चौकशीत स्पष्ट झाले आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दबावाखाली काम केल्याचे यापैकी अनेक अभियंत्यांनी चौकशीत सांगितले आहे. त्यामुळे आता अंतिम चौकशीत विश्वास पाटील यांच्यावर ठपका ठेवला जातो किंवा नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

अनियमितता असलेल्या फाईल्स

पंखी डेव्हलपर्स, श्री साईनाथ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, लकडावाला डेव्हलपर्स, विनस्माईल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि., शिवम डेव्हलपर्स, मॅरेथॉन नेक्स्टजन रिएल्टी लि., सिगशिया कन्स्ट्रक्शन प्रा. लि., कैलाश यादव अँड शिवराज डेव्हलपर्स, चिंतामणी रिएल्टी प्रा. लि., महेक डेव्हलपर्स, एम एम कॉर्पोरेशन, एम. एम. डेव्हलपर्स, सिद्धार्थ इंटरप्राईझेस,श्री कन्स्ट्रक्शन अँड शिवानी रिएल्टीज् एलएलपी, हरि ओम कन्स्ट्रक्शन, श्रीपती राईज इस्टेट एलएलपी, योगेश्वरी कन्स्ट्रक्शन, सृष्टी राज इंटरप्राईझेस एलएलपी, सट्टाधार कन्स्ट्रक्शन प्रा. लि., ट्रान्सकॉन डेव्हलपर्स अँड सहजानंज इंटरप्राईझेस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, काळू बुधेलिया पार्टनर ऑफ मे. के. बी असोसिएटस्, एन. के. कन्स्ट्रक्शन वर्क्‍स, विनीत बिल्डकॉन प्रा. लि., डिसव्‍‌र्ह डेव्हलपर्स, गोरेगाव इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज प्रा. लि., एस. डी. कॉर्पोरेशन, मा आशापुरा डेव्हलपर्स, अरिहन्त रिएल्टर्स, फोरमोस्ट रिएल्टर्स, ट्रॅक इस्टेट प्रा. लि., एस. डी. कॉर्पोरेशन, मे. ओमकार वेन्चर्स प्रा. लि., मे. ओमकार रिएल्टर्स अंधेरी प्रोजेक्ट प्रा.लि. निर्माण रिएल्टर्स, गोल्डन एज इन्फ्रास्ट्रक्चर, विमल असोसिएटस्, आशापुरा रामदेव बिल्डर्स प्रा. लि.

प्रत्येक प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू आहे. अहवाल आल्यानंतर त्याची बारकाईने तपासणी केली जाईल. दोषींवर निश्चितच कारवाई केली जाईल.    – दीपक कपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2018 2:19 am

Web Title: vishwas patil apartment scam part 6
Next Stories
1 रात्री उशिरा प्रवास करणाऱ्यांना झळ
2 परतीचे दोर कापल्यानेच खडसे संतप्त!
3 शिवसेना सत्तेबाहेर पडणे अशक्य !
Just Now!
X