News Flash

‘व्हिवा लाउंज’मध्ये मधुगंधा कुलकर्णी

तरुण पिढीतील आश्वासक कलाकार-लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांच्या अभिनयास तसेच लेखनास सर्वसामान्य प्रेक्षकांपासून समीक्षकांनी पसंतीची पोचपावती दिली आहे.

| May 3, 2015 02:29 am

तरुण पिढीतील आश्वासक कलाकार-लेखिका मधुगंधा कुलकर्णी यांच्या अभिनयास तसेच लेखनास सर्वसामान्य प्रेक्षकांपासून समीक्षकांनी पसंतीची पोचपावती दिली आहे. चित्रपट, नाटक, मालिका, साहित्य या सर्व माध्यमांमध्ये त्यांनी लीलया वावर केला आहे. मधुगंधा कुलकर्णी यांच्याशी मुक्त संवादाचा कार्यक्रम mu08व्हिवा लाउंजच्या निमित्ताने येत्या बुधवारी, ६ मे रोजी मुंबईत होणार आहे.
मधुगंधा यांनी लिहिलेल्या ‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपटाला या वर्षीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची बाजू मधुगंधा यांनी सांभाळली होती. ‘होणार सून मी या घरची’ या लोकप्रिय मालिकेची पटकथा मधुगंधा यांनी लिहिली आहे, तर ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून अभिनेत्री म्हणून त्या प्रेक्षकांसमोर येत आहेत. ‘लाली लीला’ या नाटकातील अभिनयाने त्यांनी लक्ष वेधून घेतले होते.
मधुगंधा यांनी लहानपणापासूनच लिहायला सुरुवात केली. त्यांचे ‘लग्नबंबाळ’ हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर गाजत आहे. या लोकप्रिय तरुण लेखिका-अभिनेत्रीशी संवाद साधण्याची संधी येत्या बुधवारी केसरी प्रस्तुत लोकसत्ता व्हिवा लाउंजधून मिळणार आहे. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे.

*कधी – बुधवार, दिनांक ६ मे
*कुठे – स्वा. सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्कसमोर, दादर (प)
*वेळ – सायंकाळी ६ वाजता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2015 2:29 am

Web Title: viva lounge madhugandha kulkarni
टॅग : Viva Lounge
Next Stories
1 वाहन चोरांची टोळी जेरबंद
2 अभियांत्रिकी महाविद्यालयांविरोधात लढणाऱ्या प्राध्यापकांना धमक्या
3 वाकोला गोळीबार प्रकरण: उपचारादरम्यान वरिष्ठ निरीक्षकाचा मृत्यू
Just Now!
X