News Flash

ललिता बाबर हिच्याशी गप्पांचा आजचा कार्यक्रम रद्द

व्हिवा लाउंजच्या पुढच्या पर्वाची माहिती लवकरच प्रसिद्ध केली जाईल.

‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’चा आज, मंगळवारी होणारा कार्यक्रम काही अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर हिच्याशी मुक्त संवादाचा हा कार्यक्रम दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात आयोजित करण्यात आला होता. ललिता सध्या बंगळुरू येथील क्रीडा प्रशिक्षण केंद्रात पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी कसून सराव करीत आहे. काही अपरिहार्य कारणामुळे ती तेथून सोमवारी मुंबईला येऊ शकत नसल्याचे तिने कळवल्यामुळे आजचा व्हिवा लाउंजचा कार्यक्रम होऊ शकणार नाही.
व्हिवा लाउंजच्या माध्यमातून विविध क्षेत्रात धडाडीने काम करणाऱ्या कर्तबगार स्त्रियांशी संवाद साधण्यात येतो. त्यांची प्रेरणादायी वाटचाल त्यांच्याच तोंडून ऐकायची संधी या निमित्ताने मिळते. महाराष्ट्रातील एका छोटय़ा गावातून आलेल्या ललिताचा आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवण्यापर्यंतचा प्रवासही असाच प्रेरणादायी आहे. तो ऐकायला वाचक उत्सुक होते, याची आम्हाला जाणीव आहे. व्हिवा लाउंजच्या पुढच्या पर्वाची माहिती लवकरच प्रसिद्ध केली जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2015 3:00 am

Web Title: viva lounge with lalita babar event canceled
टॅग : Viva Lounge
Next Stories
1 महिला टोळीकडून दरोडय़ाचा प्रयत्न फसला
2 कुतूहलाने बंदूक उचलली अन् गोळी सुटली..
3 विवाहिता आत्महत्याप्रकरणी पोलिसाच्या मुलास अटक
Just Now!
X